अरेच्चा... पहाटे पकडलेला वाळूचा ट्रॅक्‍टर सकाळी झाला गायब !

The traffickers caught by the sand smugglers disappeared from the premises of Tahsil
The traffickers caught by the sand smugglers disappeared from the premises of Tahsil
Updated on

आटपाडी ( सांगली ) - कौठुळी येथील माणगंगा नदीपात्रात आज पहाटे वाळू चोरी करताना सरपंच गणपत मंडले, ग्रामस्थ आणि पथकाने एक ट्रॅक्‍टर पकडला, तर दोन ट्रॅक्‍टर पळून गेले. यानंतर पकडलेला ट्रॅक्‍टर तहसीलच्या आवारातून नऊ वाजता गायब झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत आटपाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

वाळू तस्करच देतात गावकर्यांना आव्हान

कौठुळी गावातील एक युवा नेता गेल्या सहा महिन्यांपासून तीन ट्रॅक्‍टरच्या माध्यमातून राजरोसपणे नदीतून वाळूची चोरी करत आहे. त्याला ग्रामस्थांनी अनेक वेळा समजावून सांगितले तरीही तो दाद देत नव्हता. उलट ग्रामस्थांनाच काहीही करा, म्हणून आव्हान देतो आहे. काही दिवसांपासून ग्रामस्थ त्याच्या मागावर होते.

रात्रभर पहारा दिलेल्या ग्रामस्थांचे श्रम वाया 

अनेक वेळा महसूलच्या पथकाला आणि अधिकाऱ्यांना फोन केला, पण पथक येईपर्यंत ट्रॅक्‍टरने पलायन केले. काल रात्रीही सरपंच गणपत मंडले मंडले, नवनाथ कदम, अजित कदम यांनी नदीतच तळ ठोकला. ट्रॅक्‍टर नदीत आले. महसूल विभागाला माहिती दिली, पण त्यांनी दाद दिली नाही. अखेर ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. सारी सूत्रे गतीने हलली आणि पथक थंडीत पहाटे साडेतीन वाजता नदी पात्रात दाखल झाले. तीन ट्रॅक्‍टर रंगेहात सापडले. यातील एक ट्रॅक्‍टर पकडला, तर दोन पळून गेले. पकडलेला ट्रॅक्‍टर घेऊन पथक आणि ग्रामस्थ तहसील कार्यालयात आले. सकाळीच पंचनामा आवरला. नऊ वाजता ग्रामस्थ घरी गेले आणि कार्यालयाच्या आवारातील पकडलेला ट्रॅक्‍टर गायब झाला. या घटनेने खळबळ उडाली आहे. ग्रामस्थांनी तहसीलदारांची भेट घेतली, मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर सायंकाळी तलाठी विजय पाटील यांनी पोलिस ठाण्यात ट्रॅक्‍टर गायब झाल्याची तक्रार दाखल केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com