
Idol immersion tragedy in Krishna river: Two drowned, two rescued; elderly man’s body recovered.
esakal
सांगली: सातव्या दिवशीच्या गणेश विसर्जनासाठी गेलेले दोघे कृष्णा नदीत बुडाले. मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज आणि पद्माळे येथे या दोन घटना घडल्या. कसबे डिग्रज येथील वृद्ध अरुण मुरलीधर देसाई (वय ६२) यांचा मृतदेह स्पेशल रेस्क्यू फोर्सला सापडला आहे, तर पद्माळे येथे तिघे जण काल रात्री बुडाले. पैकी दोघांना वाचवण्यात यश आले. आदित्य चंद्रकांत नलावडे (वय २२, कवलापूर) हा वाहून गेला त्याचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता.