धक्कादायक घटना! मुलाच्या आत्महत्येनंतर वडिलांचाही मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

सांगली : मृत्यूशी झुंजणारया वडिलांच्या चिंतेने व्यथीत झालेल्या एका मुलाने आत्महत्या केली आणि काही वेळातच मुलाच्या आत्महत्येच्या घटनेनंतर वडिलांचाही मृत्यू झाला. सांगलीमध्ये ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे.

सांगली : मृत्यूशी झुंजणारया वडिलांच्या चिंतेने व्यथीत झालेल्या एका मुलाने आत्महत्या केली आणि काही वेळातच मुलाच्या आत्महत्येच्या घटनेनंतर वडिलांचाही मृत्यू झाला. सांगलीमध्ये ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे.

सांगलीच्या वारणाली येथे राहणाऱ्या आशिष दिलीप वायचळ वय ,३० यानी आज आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मात्र या आत्महत्याचे कारण आणि त्यानंतरची घटना ही मन सुन्न करणारी आहे. आशिष वायचळ याच्या वडिलांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातात दिलीप वायचळ हे गंभीर जखमी झाल्याने अत्यावस्थ असल्याने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दिलीप वायचळ यांच्यावर उपचार सुरू होते. तर वडिलांची प्रकृती चिंताजनक असल्याने वडिलांच्या काळजीपोटी व्यथीत होऊन आशिषने आज सकाळी आपल्या वारणाली येथील राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.

या घटनेने वायचळ कुटुंबियांना मोठा धक्का बसला होता. या घटनेतून वायचळ कुटुंब अजून सावरायचे होते. तोच दुसरीकडे मृत्यूशी झुंज देणारे आशिषचे वडील दिलीप वायचळ यांची ही प्राणजोत मावळली. मुलगा आणि वडील यांच्या एकाच वेळी झालेल्या या मृत्यूच्या घटनेने वायचळ कुटुंबियांवर अक्षरश दुःखाचा डोंगर कोसळला आहे.तर वारणाली परिसरावर शोककळा पसरली आहे. 

Web Title: In a tragic incident, son commits suicide just after his fathers death