"Car and tempo collision near Yogewadi claims two lives, injures three others."
Sakal
पश्चिम महाराष्ट्र
Sangli Accident:'योगेवाडीजवळ अपघातात दोन ठार, तिघे जखमी'; चारचाकी वाहन-टेम्पो यांच्यात जोरदार धडक,नेमकं काय घडलं
Fatal Accident at Yogewadi: सर्व जखमींना ग्रामीण रुग्णालय, तासगाव येथे आणि पुढे खासगी रुग्णालयात पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल मोटारचालक जितेंद्र मोरे यांच्याविरोधात नामदेव मारुती सरगर यांनी तासगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे.
तासगाव : तासगाव-कवठेमहांकाळ रस्त्यावर योगेवाडी गावानजीक चारचाकी वाहन आणि मालवाहू टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात दोघे ठार, तर तीनजण जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली. या अपघातात सोपान मारुती सरगर (वय ३४) व नामदेव सरगर (३१) या दोघांचा मृत्यू झाला. जखमींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. अपघातात मृत्यू पावलेले दोघेही फळविक्रेते आहेत.