

आईच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या लेकरावरच काळाचा घाला, किरणसाठी अख्खी सांगली हळहळतेय
esakal
Son Dies Way To Funeral : बाळासाहेब गणे : जगात मायलेकाचे प्रेम सर्वश्रृत आहे. याच मायेच्या ओढीने आईच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या लेकरावरच काळाने घाला घातला. पत्नीपाठोपाठ मुलावरही अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ आली अन् कुटुंबासह गाव शोकसागरात बुडाले.
ही दुर्दैवी घटना समडोळी (ता. मिरज)येथील रहिवासी किरण बाबासो कुदळे (मूळ दुधगाव) यांच्या कुटुंबात घडली. त्यांच्या पत्नी मृणाल फार्मासिस्ट आहेत. गेली ४० वर्षे समडोळी येथे जिनेंद्र मेडिको या व्यवसायानिमित्त स्थायिक झाले.