भाजप-शिवसेनेतील ताणलेल्या संबंधांचा कऱ्हाडमध्ये ट्रेलर

shivsena_bjp
shivsena_bjp

कऱ्हाड - राज्यात भाजप व शिवसेनेतील तणाव सध्या वाढला आहे. त्यामुळे सत्तेत असुनही दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडुन एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यात लातूरच्या कार्यक्रमात भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेसोबत युती झाली तर ठीक, नाही झाली तर शिवसेनेला पटक देंगे असे वक्तव्य केले होते. त्यामुळे युतीतील संबधं अधिकच ताणले गेले आहेत. त्याचे पडसाद काल येथील बसस्थानक इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात दिसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. उदघाटनाच्या कार्यक्रमासाठी शिवसेनेच्या जोडीला काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते असताना भाजपच्या नेत्यांना मात्र डावलण्यात आल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. 

राज्यात भाजप शिवसेनेच्या युतीचे सरकार आहे. दोन्ही पक्ष सत्तेत असतानाही निवडणुकीच्या तोंडावर सध्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडुन जोरदार आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांना आयती संधी मिळत आहे. सध्या दोन्ही पक्षांनी निवडणुकीसाठी एकला चलो रे चा नारा दिला आहे. त्यामुळे आरोपांत आणखीच भर पडली आहे. त्यामध्ये तेल ओतण्याचे काम भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या लातुर येथील वक्त्यव्याने झाले आहे. शहा यांनी युतीच्या कन्फ्युजनमध्ये राहू नका. शिवसेनेसोबत युती झाली तर ठिक नाही झाली तर शिवसेनेला पटक देंगे. युती झाली तर मित्राला जिंकवू, नाही झाली तर शिवसेनेला आस्मान दाखवू...असे वक्तव्य केले. त्यामुळे संबंध ताणले गेल्याचे बोलले जात आहे. त्याचा ट्रेलरच कालच्या येथील बसस्थानक इमारतीच्या उदघाटनात दिसुन आल्याचे बोलले जात आहे. कालच्या बसस्थानक उदघाटनासाठी शिवसेनेच्या जोडीला काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते असताना भाजपच्या नेत्यांना मात्र डावलण्यात आल्याची चर्चा आहे. निमंत्रण पत्रीकेत पालकमंत्री विजय शिवतारे यांचे नाव होते. मात्र तेही या कार्यक्रमास उपस्थित राहिले नाहीत. त्याचबरोबर नगराध्यक्षा रोहिणी शिंदे याही उपस्थित राहिल्या नाहीत. महसुलमंत्री चंद्रकांत पाटील हे पुणे पदवीधर मतदार संघाचे आमदार आहेत. त्याचबरोबर राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर आणि विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष अतुल भोसले हे दोन राज्यमंत्री दर्जाचे नेते कऱ्हाडमधीलच आहेत. त्यामुळे त्यांना या कार्यक्रमासाठी बोलवणे अपेक्षीत होते असे भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणने आहे. मात्र त्यांना निमंत्रणच देण्यात न आल्याने त्याचीच सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.  

पाटलांची अचानक उपस्थिती  
सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील हे बसस्थानक इमारतीच्या उदघाटन कार्यक्रमासाठी अचानकपणे उपस्थित राहिले. त्यांची उपस्थिती ही कऱ्हाडच्या दृष्टीने महत्वाची असली तरी निमंत्रण पत्रिकेत मात्र त्यांचे नावच नव्हते. त्यामुळेही आश्चर्य व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com