मोहोळ पोलिस ठाण्यातील पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या

राजकुमार शहा 
शुक्रवार, 15 जून 2018

मोहोळ (सोलापुर) - मोहोळ पोलिस ठाण्यातील पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असुन पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के हे आजारी असल्याने ते गेल्या दोन महिन्यापासुन रजेवर आहेत. तर एक पोलिस निरीक्षक निलंबित झाले आहेत. त्यामुळे मोहोळ पोलीस ठाण्याला अधिकाऱ्यांची मोठी वनवा जाणवत आहे 

सोलापुर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोहोळ हे मध्यवर्ती ठिकाण आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतुन मोठा राष्ट्रीय महामार्ग व राज्यमार्ग जातो. त्यामुळे अनेक गुन्हेगार या ठिकाणाहुन गुन्हे करून पळुन जाण्यात यशस्वी होतात. त्याची नोंद मात्र मोहोळ पोलीस ठाण्यात होते 

मोहोळ हे संवेदनशील असल्याने अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची या ठिकाणाहुन ये जा सुरू असते सध्या सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बडाख यांच्या कडे पोलिस निरीक्षक पदाचा पदभार आहे पोलीस ठाण्याचा कारभार जरी सुरळीत सुरू असला तरी कांही महत्वाच्या निर्णयासाठी पोलीस निरीक्षक असणे गरजेचे आहे दरम्यान आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पुणे ग्रामिण येथुन बदलुन आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले हे रुजु झाले आहेत 

या अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या 
सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बडाख-  पुणे ग्रामिण 
सहाय्यक पोलीस निरीक्षक दतात्रय निकम - माढा 
सहाय्यक पोलिस निरीक्षक  रविंद्र तेलतुंबडे - करमाळा  
पोलीस उपनिरीक्षक राजु राठोड - पुणे ग्रामिण 
पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब जाधव - पुणे ग्रामिण

Web Title: transfer of five officers of Mohol police station