बेळगाव शैक्षणिक जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांची बदली

बसवराज नलतवाड नवे शिक्षणाधिकारी
education department announced the list of transfer teachers
education department announced the list of transfer teacherssakal

बेळगाव : राज्यातील 22 शिक्षणाधिकाऱ्यांना जिल्हा शिक्षणाधिकारी पदावर बढती देण्यात आली आहे. तर आठ जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये बेळगाव शैक्षणिक जिल्हा शिक्षणाधिकारी ए. बी. पुंडलिक यांचाही समावेश असून त्यांच्या जागी बसवराज नलतवाड यांची बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी नेमणूक करण्यात आली आहे. शिक्षण खात्याने सोमवारी संध्याकाळी यादी जाहीर करीत विविध जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याची माहिती दिली आहे. यामध्ये अनेक शिक्षणाधिकाऱ्यांना बढती देण्यात आली आहे.(education department announced the list of transfer teachers)

education department announced the list of transfer teachers
नायजेरिया येथून आलेली ओमिक्राॅनबाधित महिला उपचारानंतर सुखरुप घरी परतली

तर काही जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या इतर ठिकाणी बदल्या करण्यात आल्या आहेत. पुंडलिक हे गेल्या काही वर्षांपासून जिल्हा शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होते. मात्र आता त्यांची बदली बेळगाव येथील सरकारी बीएड महाविद्यालयात करण्यात आली आहे . तर सरकारी बीएड महाविद्यालयात कार्यरत असणारे शिक्षणाधिकारी नलतवाड याना बढती मिळाली असून नलतवाड आता जिल्हा शिक्षणाधिकारी म्हणून कामकाज सांभाळणार आहेत. नलतवाड यांनी यापूर्वी शहर गटशिक्षणाधिकारी पदावर काम केले आहे तसेच इतर ठिकाणीही ते गट शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होते.चिकोडी शैक्षणिक जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी पदी मोहन हल्ल्याटी यांची नेमणूक करण्यात आली आहे अचानकपणे विविध शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यामुळे शिक्षण खात्यातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com