परिवहन महामंडळ बेळगाव विभागाला ५० कोटी रुपयांचा फटका

ओमीक्रॉन या नव्या व्हेरीयंटचा धोकाही वाढल्यामुळे दोन्ही राज्यांदरम्यान आणखी काही दिवस बससेवा विस्कळीत
परिवहन महामंडळ बेळगाव
परिवहन महामंडळ बेळगाव sakal

बेळगाव : कर्नाटक महाराष्ट्र (Karnataka Maharashtra)आंतरराज्य सेवा बंद असल्यामुळे कर्नाटकाच्या वायव्य परिवहन महामंडळ बेळगाव (Transport Corporation Belgaum)विभागाला मागील ११ महिन्यात ५० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. आता पुन्हा महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे आणि ओमीक्रॉन या नव्या व्हेरीयंटचा धोकाही वाढल्यामुळे दोन्ही राज्यांदरम्यान आणखी काही दिवस बससेवा विस्कळीत राहणार आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे फेब्रुवारी २०२१ मध्ये कर्नाटकाने महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी अहवाल सक्तीचा केला होता. त्यामुळे महाराष्ट्राने एसटी महामंडळाच्या बसेस कर्नाटकात पाठविणे बंद केले. त्यापाठोपाठ प्रवासी नसल्यामुळे कर्नाटकाच्या बसेसचीही संख्या घटली. महाराष्ट्रातून बसेस येत नसताना देखील कर्नाटकातून मात्र परिवहन मंडळाच्या तसेच महाराष्ट्रात जातच होत्या पण प्रवासी नसल्यामुळे कर्नाटकाला महसूलावर पाणी सोडून नुकसान सहन करावा लागला.

परिवहन महामंडळ बेळगाव
बेळगाव महापालिकेचे स्वच्छ टेक्नॉलॉजी चॅलेंज, प्रस्ताव मागविले

केवळ बेळगाव विभागाचा विचार केल्यास महाराष्ट्रात चंदगड आणि कोल्हापूरमार्गे बेळगावातून बसेस धावतात. ज्यातून बेळगाव विभागाला रोज १५ ते १८ लाख रुपयांचा महसूल प्राप्त होतो. पण फेब्रुवारी महिन्यापासून सेवा विस्कळीत असल्यामुळे बेळगाव विभागाचाही महसूल घटला आहे. मागील ११ महिन्यात बेळगावातून केवळ २ बसेस नाशिक आणि मुंबई मार्गावर सोडण्यात आल्या. एकूणच वायव्य परिवहन महामंडळाकडून पिंपरी, मुंबई, नाशिक, शिर्डी, ठाणे, पंढरपूर केवळ याच मार्गावर बसेस धावल्या पण, यात देखील नुकसान सोसावे लागले आहे.

बेळगाव विभागाचा तसेच वायव्य परिवहन महामंडळाचा नफा आणि तोटा हा महाराष्ट्र आंतरराज्य सेवेवर अवलंबून आहे. पण ही सेवा विस्कळीत असल्यामुळे परिवहन मंडळाला महाराष्ट्र आंतरराज्य सेवेतून ५० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. परिवहन मंडळाच्या तिजोरीत देखील खणखणाट असून कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इंधनाचा खर्च देखील भागविणे परिवहन मंडळाला कठीण ठरले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com