परिवहन कामगारांचा संप तूर्त मागे ; न्यायालयीन लढा चालूच राहणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

लाल बावटा महानगर पालिका कामगार युनियनच्या वतीने ९ एप्रिल २०१८ रोजी संप पुकारण्यात आला होता. तो संप आज (रविवार) ज्येष्ठ कामगार नेते कॉ.नरसय्या आडम मास्तर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सर्व परिवहन कामगार कर्मचाऱ्यांची बैठक बोलावून चर्चेअंती मागे घेण्याचा निर्णय झाला.

सोलापूर : सोलापूर महानगर पालिका परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांना थकीत वेतन तातडीने द्या, या मागणीसाठी ३४ दिवसांपासून सुरु असलेला संप आज मागे घेण्यात आला.

लाल बावटा महानगर पालिका कामगार युनियनच्या वतीने ९ एप्रिल २०१८ रोजी संप पुकारण्यात आला होता. तो संप आज (रविवार) ज्येष्ठ कामगार नेते कॉ.नरसय्या आडम मास्तर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सर्व परिवहन कामगार कर्मचाऱ्यांची बैठक बोलावून चर्चेअंती मागे घेण्याचा निर्णय झाला.

परिवहन कामगारांच्या संपाच्याबाबतीत घेतलेला निर्णय अत्यंत असमाधानकारक असून नागरिकांची गैरसोय टाळावी व सर्वाना परिवहनची वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी याकरिता संप मागे घेण्याचा निर्णय परिवहन कामगारांच्या बैठकीत घेण्यात आला.

तसेच लाल बावटा महानगर पालिका कामगार युनियनच्या वतीने न्यायालयात चालू असलेली लढाई चालू ठेऊन न्यायालयातून कामगार हिताचा निर्णय घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. १४ मेपासून सर्व परिवहन कामगार कर्मचारी कामावर रुजू होतील, असे आडम यांनी सांगितले.

Web Title: Transport workers Strike still back The judicial fight will continue