सांगलीत ट्रॅव्हल कंपनीचे कार्यालय फोडले 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

सांगली - बसस्थानक जवळील मुख्य रस्त्यावर शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी ट्रॅव्हल कंपनीचे कार्यालय फोडले. कॅश काऊंटर उचकटून अडीच लाखांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. मुख्य रस्त्यावर झालेल्या या चोरीने शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागले असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना झाली आहेत. 

सांगली - बसस्थानक जवळील मुख्य रस्त्यावर शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी ट्रॅव्हल कंपनीचे कार्यालय फोडले. कॅश काऊंटर उचकटून अडीच लाखांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. मुख्य रस्त्यावर झालेल्या या चोरीने शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागले असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना झाली आहेत. 

याबाबतची अधिक माहिती अशी, बापट बाल मंदिर शाळेसमोरील मुख्य रस्त्यावर महंमद रफीक राऊतर यांचे "एम. बी. लींक' ट्रॅव्हल कंपनीचे कार्यालय आहे. गेल्या बावीस वर्षांपासून त्यांचा हा व्यवसाय आहे. सांगलीतील मुख्य कार्यालय असल्याने आर्थिक देवाण-घेवाण मोठ्या प्रमाणावर असते. श्री. राऊतर हे मूळचे कोल्हापूरचे असून व्यवसायानिमित्त सांगलीत स्थायिक झाले आहेत. काल रविवारची सुटी असल्याने मोठ्ठा गल्ला जमा झाला होता. नेहमीप्रमाणे रात्री एक वाजता सारे व्यवहार संपवून कार्यालय बंद करण्यात आले. 

आज सकाळी सातच्या सुमारास व्यवस्थापक माने यांनी कार्यालय उघडण्यासाठी आले. त्यावेळी त्यांना शटरचे कुलूप गायब असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी कार्यालयात प्रवेश केला असता कॅश काऊंटर फोडल्याचे दिसले. त्यांतर तत्काळ मालक राऊतर यांना माहिती देण्यात आली. त्यांनी कार्यालयात दाखल झाल्यानंतर शहर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यात कॅश काऊंटमधील अडीच लाखांची रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याचे समोर आले. 

दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यावेळी मध्यरात्री दोनच्या सुमारास चोरट्याने कार्यालयात प्रवेश केला. त्यानंतर सीसीटीव्हीचा डीव्हीआर बंद केला. त्यानंतर रोकड लंपास केली. मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी तातडीने शोध पथके रवाना केली. 

बनावट चावीचा वापर.. 
कार्यालयाच्या शटरचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्यांनी प्रवेश केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आहे. सोबत कुलूपही चोरून नेले. त्यामुळे माहितीगाराने पाळत ठेवून चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. 

Web Title: travel company office hit