कचरा पेटवल्याने तीन झाडांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

कचऱ्याची सोप्या पद्धतीने विल्हेवाट लावता येत असताना कचरा जाळण्यात येतो. यामुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. कचरा जाळणाऱ्यांवर प्रशासनाने कडक कारवाई करायला हवी. या विषयावर जनजागृती गरजेची आहे. झाडांचे म्हणजे पर्यावरणाचे नुकसान झाले तर मानवाला त्याचा धोका आहेच शिवाय वन्यजीवांच्या अधिवासालाही धोका आहे. 
- शुभम अक्षंतल, फिर्यादी

सोलापूर : जुळे सोलापुरातील सिंधू विहार परिसरात हॉटेल सेलिब्रेशनच्या कर्मचाऱ्यांनी कचरा पेटवल्याने शेजारी राहणाऱ्या नागरिकाच्या जागेतील तीन झाडांना झळ लागून नुकसान झाले. याप्रकरणी हॉटेलचे मालक अभिजित टाकळीकर आणि दोघा कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शुभम अक्षंतल यांनी विजयपूर नाका पोलिसात फिर्याद दिली आहे. 3 मे रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास हॉटेलमधील कामगारांनी त्यांच्या मालकीच्या रिकाम्या जागेत सुका कचरा टाकून त्याला आग लावली. वाऱ्याने आग पसरली. शेजारी राहणाऱ्या अक्षंतल यांच्या बंदिस्त भिंतीच्या आत असलेल्या लिंबू, कढीपत्ता व तगर या झाडांना झळ लागून झाडांचे नुकसान झाल्याचे फिर्यादित नमूद आहे. 

कचऱ्याची सोप्या पद्धतीने विल्हेवाट लावता येत असताना कचरा जाळण्यात येतो. यामुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. कचरा जाळणाऱ्यांवर प्रशासनाने कडक कारवाई करायला हवी. या विषयावर जनजागृती गरजेची आहे. झाडांचे म्हणजे पर्यावरणाचे नुकसान झाले तर मानवाला त्याचा धोका आहेच शिवाय वन्यजीवांच्या अधिवासालाही धोका आहे. 
- शुभम अक्षंतल, फिर्यादी

Web Title: tree catches fire in solapur