‘पीडब्ल्यूडी’कडून वृक्षांचे विद्रुपीकरण!

बुध - झाडांना खिळे ठोकून व साली काढून सार्वजनिक बांधकाम खात्याने नंबरप्लेट लावल्या आहेत.
बुध - झाडांना खिळे ठोकून व साली काढून सार्वजनिक बांधकाम खात्याने नंबरप्लेट लावल्या आहेत.

बुध - खटाव तालुक्‍यातील पुसेगाव ते मोळ रस्त्याच्या दुतर्फा शेकडो वृक्षांवर क्रमांक टाकण्याच्या नावाखाली झाडांच्या साली काढून आणि खिळे ठोकून खुद्द सार्वजनिक बांधकाम खात्यानेच वृक्षांचे विद्रुपीकरण केले आहे. 

पुसेगाव-फलटण मार्गावरील पुसेगाव ते मोळ या दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा आंबा, बाभळ, पिंपरण, करंज आदी जातीचे शेकडो वृक्ष आहेत. या वृक्षांवर ठिकठिकाणी खिळे ठोकून व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायांचे फलक, भित्तिपत्रके व जाहिराती लावल्या आहेत. याबाबत संबंधित व्यावसायिकांवर सार्वजनिक बांधकाम खात्याने कारवाई करणे अपेक्षित असताना आता खुद्द याच खात्यानेच या झाडांवर खिळे ठोकून आणि झाडांच्या साली काढून विद्रुपीकरण केल्यामुळे जाब कोणाला विचारायचा आणि कारवाई कोणावर करावयाची, असा प्रश्न पर्यावरणप्रेमींना पडला आहे. 

उत्तर खटाव परिसरातील मोळ, डिस्कळ, गारवडी, ललगुण, राजापूर, वेटणे, रणसिंगवाडी, पांगरखेल आदी गावे दुष्काळमुक्तीसाठी गेली काही वर्षे लोकसहभागातून जलसंधारण, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनासाठी अविरत झटत आहेत. या शिवाय राज्य शासन दरवर्षी कोट्यवधी वृक्षांच्या लागवडीसाठी जुलै महिन्यात राज्यभर मोहीम राबवत असते. या उपक्रमातही विभागातील शासकीय, निमशासकीय संस्था, शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, स्वयंसेवी संस्था व नागरिक सहभागी होवून मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करीत आहेत. मात्र, काही विकृत लोक झाडांना खिळे ठोकून फलक लावणे, बुंद्यावर नाव कोरणे यासारखी कृत्ये करून झाडांना इजा पोचवत झाडांचे आयुष्य कमी करत आहेत. माणसांप्रमाणे झाडांनाही वेदना व आजार होत असतात. झाडे कमी झाली की पावसाचे प्रमाणही कमी होते. परिणामी दुष्काळाचे दुष्टचक्र सुरू होते. यासाठी नवीन लागवडीबरोबरच मोठी झाडे जास्तीत जास्त दिवस टिकवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com