नगर : आदिवासी महिला अंधश्रद्धेची बळी!

Tribal women a victim of superstition
Tribal women a victim of superstition

बोटा (संगमनेर, नगर) : सर्पदंश झालेल्या आदिवासी महिलेचा अंधश्रद्धेपायी बळी गेला. एका भगताचे मंत्रोपचार तिला वाचवू शकले नाहीत. नंतर तिला दवाखान्यात नेले; पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. अखेर डोक्‍याला हात लावण्याची वेळ तिच्या पतीवर आली.


मन सुन्न करणारी ही घटना संगमनेर तालुक्‍यातील कौठे गावानजीक असलेल्या खांडगेदरा येथे घडली. गंगूबाई दामू दुधवडे (वय 40), असे या घटनेत मृत्यू झालेल्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. खांडगेदरा परिसरात आदिवासी समाजाची लोकवस्ती आहे. तेथील दामू दुधवडे कुटुंबासह मजुरीसाठी बाहेरगावीच असतात. काही कामानिमित्त ते 15 दिवसांसाठी खांडगेदरा येथे आले होते. त्यांच्या पत्नी गंगूबाई यांना शुक्रवारी (ता. सहा) पहाटे साप चावला.

पत्नीला उपचारासाठी कुठे न्यावे, या विचारात असलेल्या दामू यांना तेथील लोकांनी, डोळासणे येथील काटवन शिवारातील भगताकडे (नाव समजले नाही) नेण्याचे सुचविले. भगताने याआधी अशा घटनांतील शंभर जणांना बरे केल्याचाही दावा त्यांनी केला.

किमान बारावी शिकलेल्या दामू यांनाही तो पटला. त्यांची पावले नकळत डोळासणेकडे वळली. भगताने गंगूबाई यांच्यावर मांत्रिक उपचार केले व घरी जाण्यास सांगितले. घरी आल्यावर गंगूबाई यांना दोन तासांनी पुन्हा त्रास जाणवू लागला. मग मात्र दामू यांनी त्यांना उपचारासाठी संगमनेरमध्ये रुग्णालयात नेले. या

दरम्यान, सापाचे विष त्यांच्या संपूर्ण शरीरात भिनले होते. उपचाराला दाद न दिल्यामुळे अखेर गंगूबाई यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, याची कोठेही वाच्यता होऊ नये म्हणून ही बाब गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com