दहा लाखांची खंडणी मागणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल 

परशुराम कोकणे
रविवार, 6 मे 2018

सोलापूर - जनता सहकारी बॅंक पुणे यांच्याकडून कर्ज मिळाल्यानंतर माझ्यामुळेच कर्ज मंजूर झाले असे म्हणून दहा टक्‍याप्रमाणे कमीशन म्हणून दहा लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

सोलापूर - जनता सहकारी बॅंक पुणे यांच्याकडून कर्ज मिळाल्यानंतर माझ्यामुळेच कर्ज मंजूर झाले असे म्हणून दहा टक्‍याप्रमाणे कमीशन म्हणून दहा लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

सिकंदर शेख ऊर्फ लाल अहमद शेख (रा. सिद्धेश्‍वर पेठ, सध्या- सिव्हील लाइन, सात रस्ता, सोलापूर), शेख (पूर्ण नाव माहित नाही), आणि दीपक बनसोडे अशी तिघा आरोपींची नावे आहेत. शिवपुत्र इराण्णा लच्याण (वय 63, रा. स्नेहल पार्क) यांनी फिर्याद दिली आहे. लच्याण यांचा मुलगा अमोल यांच्या शैक्षणिक कर्जासाठी यापूर्वी शेखच्या मदतीने जनता सहकारी बॅंक पुणे सोलापूर शाखेत प्रयत्न केला होता. तेव्हा कर्ज मिळाले नव्हते. अमोल यांचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तडवळ (ता. अक्कलकोट) येथे नवीन दवाखाना सुरु करण्यासाठी जनता सहकारी बॅंक पुणे यांच्याकडे कर्ज प्रकरण केले होते. कर्ज प्रकरण मंजूर झाल्याने सिकंदर शेख याने मी बॅंकेचा एजंट आहे, कर्ज प्रकरण माझ्या मुळेच मंजूर झाले आहे असे म्हणून दहा टक्‍क्‍याप्रमाणे दहा लाख रुपयांची मागणी केली. पैसे का देत नाही म्हणून लच्याण यांच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करून शिवीगाळ व मारहाण केली. मुलगा डॉ. अमोल याचे अपहरण करतो अशी धमकीही दिली. याप्रकरणाचा तपास विजापूर नाका पोलिस करत आहेत.

Web Title: Tribute crime