truck accident in nerle sangli but no injured in accident
truck accident in nerle sangli but no injured in accident

दैव बलवत्तर म्हणून वाचले चारजण ; गॅरेजमध्ये घुसला ट्रक आणि..

Published on

नेर्ले (सांगली) : पेठ इस्लामपूर जिल्हा मार्गावरील गॅरेजमध्ये ट्रक शिरल्याने दीड लाखाचे नुकसान झाले. यात दोन दुचाकींचा चक्काचूर झाला. गॅरेज मालक थोरावडे याच्यासह चौघांनी उड्या मारल्याने सुदैवाने त्यांचा जीव वाचला. यावेळी मद्य नशेत असलेला चालक गणेश नायकल (रा. नायकलवाडी) याला स्थानिक युवकांनी चांगलाच चोप देवून पोलीसांच्या ताब्यात दिले.
  
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मरळनाथपूर येथील बारा चाकी ट्रक (क्र.एम.एच.१० बी.आर.५७८७) घेऊन चालक नायकल ट्रक वळवत असताना अचानक पणे त्याचा ट्रकवरील ताबा सुटला. बाजूलाच उभ्या असलेल्या गॅरेजच्या बाहेरील शेडला उडवत ट्रक पुढील असणाऱ्या फुटवेअर मॉलमध्ये घुसून बाजूच्या पत्र्याला धडकला. यात गॅरेज समोर लावलेल्या दोन दुचाकी ट्रकच्या चाकाखाली अडकल्या. गणेश नायकला याने दारुच्या नशेत केले असल्याचे स्थानिकांनी सांगितले. दैव बलवत्तर म्हणून गॅरेज मालक थोरावडे आणि त्यांच्याबरोबर असलेल्या चौघांचा जीवा वाचला. यावेळी काही काळासाठी या मार्गावर वाहतूक ठप्प झाली होती.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com