पुलावरून ट्रक कोसळला थेट रेल्वे रुळावर

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

सोलापूर : पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रक रेल्वे पुलावरील कठडा तोडुन खाली रेल्वे रुळावर कोसळला. या घटनेत ट्रकचे नुकसान झाले असून जीवित हानी झाली नाही.

आज (ता. 29) सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. मोहोळमार्गे सोलापूरच्या दिशेने चाललेला मालट्रक वडवळ गावच्या पुलावरुन वीस फूट खाली कोसळला. या ट्रकमध्ये रस्त्याच्या कामासाठी वापरले जाणारे डांबराचे  ड्रम होते. ट्रक थेट रेल्वे रुळावर कोसळल्याने रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली आहे. ट्रक ड्रायव्हर जखमी झाला असून त्यास उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: truck collapse on railway track at solapur