सहकारमंत्र्यांच्या घरासमोर "प्रहार'चे तूर फेको आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

सोलापूर - तूर तातडीने खरेदी करावी या मागणीसाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या होटगी रोडवरील घरासमोर प्रहार शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काल सायंकाळी तूर फेको आंदोलन केले. अचानक झालेल्या आंदोलनामुळे निवासस्थानासमोर बंदोबस्तासाठी असलेला पोलिस शिपाईही गांगरून गेला होता. 

शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. प्रहारच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. निवासस्थानासमोर असलेल्या औद्योगिक पोलिस चौकीच्या दोन पोलिस तत्काळ आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. या आंदोलनावेळी सहकारमंत्री मात्र बंगल्यात नव्हते. सहकारमंत्री देशमुख हे सोलापूरचे असतानासुद्धा त्यांच्याकडून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्याच तूर खरेदीबाबत कसली कार्यवाही केली जात नसल्याचा आरोप शहराध्यक्ष कुलकर्णी यांनी केला. या आंदोलनप्रसंगी खालिद मणियार, सलीम मुजावर, शेखु कांबळे, प्रल्हाद वाघमारे, संभाजी व्हनमोरे, अनिकेत भूमकर आदी उपस्थित होते. 

Web Title: Ture pheko movement of Prahar before the house of the minister