शंभरामागे वीस यडपाट...आपल्या इथलंय, आता काय बोलायचं

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

नगर जिल्हा रुग्णालय व अकोले ग्रामीण रुग्णालय यांच्यातर्फे जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमात ग्रामीण रुग्णालयात मोफत मानसोपचार व आत्महत्या प्रतिबंध शिबिर झाले.

अकोले : ""शंभर लोकांमागे 20 जण आज मानसिक आजाराने त्रस्त आहेत. सगळ्यांना उपचाराची गरज नसते; मात्र काही लोक गंडा-दोरा करीत बसतात. मानसिक आजार वैद्यकीय उपचाराने निश्‍चित बरा होतो,'' असे मत जिल्हा मनोविकारतज्ज्ञ डॉ. योगेश गाडेकर यांनी व्यक्त केले. 

हेही वाचा - अय, भंगार क्वॉलिटीच्यांनो, इंदोरीकर काय करतात ते आधी बघा

नगर जिल्हा रुग्णालय व अकोले ग्रामीण रुग्णालय यांच्यातर्फे जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमात ग्रामीण रुग्णालयात मोफत मानसोपचार व आत्महत्या प्रतिबंध शिबिर झाले. त्या वेळी डॉ. गाडेकर बोलत होते.

वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय घोगरे, मनोविकृती चिकित्सक मीनल काटकोळ, मनोविकृती सेवक गोरख इंगोले, विवेक मगर, अनिकेत केदारी, डॉ. सुरेखा पोपेरे आदी उपस्थित होते. 

डॉ. गाडेकर म्हणाले, ""मानसिक आजाराची छोटी छोटी लक्षणे असतात. मात्र, लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. मानसिक आजार वैद्यकीय उपचाराने बरा होतो. त्यावरील उपचाराविषयी मार्गदर्शन व प्रबोधन व्हावे म्हणून जिल्हा रुग्णालयामार्फत अशी मोफत उपचार शिबिरे घेतली जातात.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twenty-one Mantle Behind the Century