पेटविलेल्या कचऱ्यामुळे दोन रुग्णवाहिका जळाल्या 

garbage
garbage

नगर - जिल्हा सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाजवळ पेटविलेल्या कचऱ्यात जिल्हा रुग्णालयाच्या दोन रुग्णवाहिका आज जळून खाक झाल्या. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या याच इमारतीशेजारी जिल्हा न्यायालयाची नवी इमारत आहे. मात्र, महापालिकेची अग्निशमन यंत्रणा वेळेत पोचल्याने मोठा अनर्थ टळला. अग्निशमन यंत्रणेने तातडीने ही आग आटोक्‍यात आणली. या ठिकाणी आज सकाळी अकराच्या सुमारास कोणीतरी कचरा पेटविल्याने शेजारील गवताने पेट घेतल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले. 

नगरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून कचरा पेटविण्याचे उद्योग सुरु आहेत. त्याकडे महापालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने अनेक अनर्थ घडत आहेत. पेटविलेल्या कचऱ्यामुळे अलिकडेच पाइपलाइन रस्त्यावरील "कलाश्री स्टुडिओ'चे एक एप्रिल रोजी साधारण दोन कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा संचालकांतर्फे करण्यात आला होता. 

असे असताना तेथूनच जवळ असलेल्या भागात वारंवार कचरा अजूनही पेटविला जातो. कचरा पेटविण्याच्या प्रकारांकडे दुर्लक्ष केल्यास आयुक्तांच्या दालनात पेटविलेला कचरा टाकण्याचा इशारा काही संघटनांतर्फे अलिकडेच देण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com