पेटविलेल्या कचऱ्यामुळे दोन रुग्णवाहिका खाक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

नगर - जिल्हा सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाजवळ पेटविलेल्या कचऱ्यात जिल्हा रुग्णालयाच्या दोन रुग्णवाहिका सोमवारी जळून खाक झाल्या. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या याच इमारतीशेजारी जिल्हा न्यायालयाची नवी इमारत आहे. मात्र, महापालिकेची अग्निशामक यंत्रणा वेळेत पोचल्याने मोठा अनर्थ टळला. 

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी आज सकाळी साडेअकराच्या सुमारास कोणी तरी कचरा पेटविल्याने शेजारील गवताने पेट घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. जिल्हा न्यायालयाशेजारील जागेत जिल्हा शल्यचिकित्सकांसह इतर अधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत. जुन्या सदनिकांच्या अवतीभोवती वाढलेले गवत व कचरा साठला होता. या कचऱ्यातच जिल्हा रुग्णालयाची काही वाहने उभी केलेली असतात. सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास या परिसरातील कचरा पेटविल्याने लागलेल्या आगीत दोन रुग्णवाहिका जळाल्या. 

नगरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून कचरा पेटविण्याचे उद्योग सुरू आहेत. पेटविलेल्या कचऱ्यामुळे पाइपलाइन रस्त्यावरील "कलाश्री स्टुडिओ'चे एक एप्रिल रोजी साधारण दोन कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा संचालकांकडून अलीकडेच करण्यात आला होता. असे असताना तेथूनच जवळ असलेल्या भागात अजूनही वारंवार कचरा पेटविला जातो.

Web Title: Two ambulances burnt due to shadowed rubbish