मिरजेत पोलिस स्टेशन ठाण्यासमोरच दोघांवर कोयत्याने हल्ला; सांगलीच्या एमडी गॅंगचीर राडेबाजी 

प्रमोद जेरे 
Sunday, 22 November 2020

युनुस नदाफ आणि इम्रान नदाफ यांनी समाज माध्यमावर टाकलेल्या एका पोस्टवरून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. तथापि इम्रान नदाफ आणि मोहसीन पठाण यांच्यातील वादास आर्थिक देवाणघेवाणीचा एक संदर्भ जोडला जात आहे. मोसिन पठाण हा गेल्या काही दिवसांपासून इम्रान नदाफकडे पैशाची मागणी करत होता.

मिरज (सांगली) : शहरातील पोलिस ठाण्यासमोर दोघा तरुणांना सांगलीच्या एमडी गॅंगचा प्रमुख मोहसीन पठाण यांने काही तरुणांना सोबत घेऊन हा हल्ला केला. इम्रान नदाफ आणि यूनूस नदाफ अशी जखमी तरुणांची नावे आहेत. हल्ल्यावेळी युनुस नदाफ या जखमी तरुणाने जखमी अवस्थेतही हल्लेखोर मोसिन पठाण याला पकडून ठेवले त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन मोहसीन पठाण याला ताब्यात घेतले. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की नुकत्याच झालेल्या टिपू सुलतान जयंती निमित्त युनुस नदाफ आणि इम्रान नदाफ यांनी समाज माध्यमावर टाकलेल्या एका पोस्टवरून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. तथापि इम्रान नदाफ आणि मोहसीन पठाण यांच्यातील वादास आर्थिक देवाणघेवाणीचा एक संदर्भ जोडला जात आहे. मोसिन पठाण हा गेल्या काही दिवसांपासून इम्रान नदाफकडे पैशाची मागणी करत होता. परंतु यावरूनच दोघांचे गेल्या काही दिवसांपासून बिनसले होते. त्यातच टिपू सुलतान जयंतीची पोस्ट समाज माध्यमांवर पडल्यानंतर या वादास नव्याने सुरुवात झाली आणि आज (रविवारी) सायंकाळी ही घटना घडली. 

सांगलीमध्ये एमडी गॅंगचा प्रमुख म्हणून वावरणाऱ्या मोहसिन पठाण याने काही तरुणांना सोबत घेऊन मिरज मार्केटमध्ये पोलीस ठाण्यासमोर उभारलेल्या इम्रान नदाफ आणि युनुस नदाफ या दोघा धोरणांवर कोयत्याने हल्ला केला. यावेळी इम्रान नदाफ याच्यावरील कोयत्याचा हल्ला रोखताना युनुस नदाफ हा जखमी झाला. दोघांवरही कोयत्याचे गंभीर वार झाले आहेत. युनुस नदाफ यांनी जखमी अवस्थेतही ही मोहसीन पठाण याला पकडून ठेवल्याने पोलिसांना त्याला ताब्यात घेता आले.या घटनेने मिरज मार्केट परिसरात काही काळ प्रचंड गोंधळ उडाला. दुकानेही बंद झाली. पोलिसांनी युनुस नदाफ याने पकडून ठेवलेल्या मोहसीन पठाण या हल्लेखोरास घटनास्थळी जाऊन ताब्यात घेतले. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two attacked with scythe in front of Miraj police station