कोल्हापूर शहरात शुक्रवारपासून दोनदिवस पाणी पुरवठा खंडीत 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

कोल्हापूर शहरातील फुलेवाडी, रिंगरोड व उपनगरे, सानेगुरुजी वसाहत, आपटेनगर, तुळजाभवानी कॉलनी, लक्षतीर्थ वसाहत, रंकाळा तलाव परिसर, महालक्ष्मी मंदिर, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, बिंदू चौक, पापाची तिकटी, खोल खंडोबा, जुना बुधवार आदीसह निम्याहून अधिक शहरात दुरूस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. 

कोल्हापूर - शहरातील ए.बी.सी.डी वॉर्डाला शुक्रवारी (ता.26) व शनिवारी(ता.27) दोन दिवस पाणीपुरवठा होणार नाही. बालिंगा उपसा केंद्राजवळ 11 केव्ही उच्च दाब पुरवठा करणाऱ्या एचटी लाईनला सलग्नीत असणाऱ्या पोलचे काम महापालिका पाणीपुरवठा विभागाने हाती घेतले आहे.त्यामुळे ह पाणीपुरवठा बंद राहणार आहे.या काळात नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन महपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे. 

कोल्हापूर शहरातील फुलेवाडी, रिंगरोड व उपनगरे, सानेगुरुजी वसाहत, आपटेनगर, तुळजाभवानी कॉलनी, लक्षतीर्थ वसाहत, रंकाळा तलाव परिसर, महालक्ष्मी मंदिर, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, बिंदू चौक, पापाची तिकटी, खोल खंडोबा, जुना बुधवार आदीसह निम्याहून अधिक शहरात या कामामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. 

टंचाईच्या काळात महापालिकेकडून पिण्यासाठी टॅंकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे. महापालिकेकडे आठ टॅंकर आहेत. आठ टॅंकरच्या माध्यमातून जादा टंचाई असलेल्य भागात प्राधान्याने पाणी पुरवठा केला जाईल.त्यामुळे नागरिकांनीही पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे. 

वांरवार पाणीपुरवठा खंडीत 
वारंवार पाणीपुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण अलिकडे वाढत आहे. भर पावसाळ्यातही नागरिकांना पाण्यासाठी प्रतिक्षा करावी लागत आहेत. आठवड्यात शिंगणापुरजवळ विद्युत यंत्रणेत बिघाड होत होता. तसेच उपसा पंपही बंद पडत होते. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. अधून मधून पाईपलाईनला गळती लागते. त्यामुळे देखील पाणीपुरवठा खंडीत होतो. त्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातच अनेक बदल करण्याची गरज नगरसेवकांनी बोलून दाखविली आहेत. आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनीही या विभागाला जादा मनुष्यबळ देण्याविषयीची भुमिका मांडली आहेत. अधिकारी,कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून जबाबदाऱ्या वाटून दिल्या तर पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two days of water supply breaks in Kolhapur city from Friday