तासगाव फाटानजीक अपघातात कोल्हापूरचे दोघे ठार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

एक नजर

  • पंढरपूर येथे देवदर्शनासाठी दुचाकीवरून जात असताना अपघात.
  • मंगळवारी मध्यरात्री मिरज पंढरपुर रोडवरील तासगाव फाटा नजीक अपघात
  • भैरवनाथ बाबुराव मेटील (वय 37), मोहन हिंदुराव बोटे (वय 40 दोघेही रा. दिंडनेर्ली ता. करवीर) हे दोघेही ठार.

कोल्हापूर - पंढरपूर येथे देवदर्शनासाठी दुचाकीवरून जात असलेल्या दोघांवर काळाने घाला घातला. मंगळवारी मध्यरात्री मिरज पंढरपुर रोडवरील तासगाव फाटा नजीक हा अपघात झाला. भैरवनाथ बाबुराव मेटील (वय 37) व मोहन हिंदुराव बोटे (वय 40 दोघे रा.दिंडनेर्ली ता.करवीर) अशी मृत तरुणांची नावे आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे दिंडनेर्ली गावावर शोककळा पसरली आहे.

दिंडनेर्ली येथील मोहन बोटे हा शाहू सहकारी साखर कारखान्यामध्ये कामाला होता. तर भैरवनाथ मेटील हा गवंडी काम करत होता. दोघांची चांगली मैत्री होती. एकादशीनिमित्त या दोघांनी दुचाकीवरून पंढरपूरला जायचे ठरवले. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी ते गावातून बाहेर पडले. रात्री बाराच्या सुमारास ते मिरज पंढरपूर मार्गावरील तासगाव फाटा येथे आले. येथे दुचाकीची ट्रकला मागून धडक बसली. या अपघातात दोघांच्याही डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मध्यरात्री स्थानिक पोलिसांकडून या घटनेची माहिती दिंडनेर्ली येथे देण्यात आली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याने दिंडनेर्ली गावावर शोककळा पसरली आहे. 

मोहन बोटे याच्यामागे आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे तर भैरवनाथ मेटील याच्या मागे वयस्कर आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. 

Web Title: Two dead in an Accident near Tasgaon Phata