दुचाकी व एसटी अपघातात माय-लेकरांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

करकंब (जि. सोलापूर) - स्वतःच्या मुलीला पंढरपूर येथील दवाखान्यात घेऊन जात असताना मोटारसायकल घसरून समोरून येणाऱ्या एसटीला धडकल्याने माय-लेकरांचा जागीच मृत्यू झाला असून, मुलगी गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात पंढरपूर-टेंभुर्णी रस्त्यावर करकंब हद्दीत खंडोबा मंदिराजवळ गुरुवारी सकाळी झाला. याबाबत करकंब पोलिस ठाण्यात अरविंद गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.

मृत झालेल्यांमध्ये दगड अकोले (ता. माढा) येथील उषा भारत गायकवाड (वय 45) आणि भूषण भारत गायकवाड (वय 21) या माय-लेकरांचा समावेश आहे. मोनाली भारत गायकवाड (वय 19) ही गंभीर जखमी असून, तिला पुढील उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले आहे.

Web Title: two death in accident