esakal | पोटच्या लेकींना विष देत बापानेच घेतला जीव; हतबलता कि आणखी काही?
sakal

बोलून बातमी शोधा

पोटच्या लेकींना विष देत बापानेच घेतला जीव; हतबलता कि आणखी काही?

पोटच्या लेकींना विष देत बापानेच घेतला जीव; हतबलता कि आणखी काही?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : दोन्ही मुलींना विष पाजून आणि त्यानंतर स्वतः विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना कंग्राळी के. एच. (ता. बेळगाव) येथे बुधवारी (ता. १४) दुपारी घडली. त्यात मुलींचे वडील अनिल चंद्रकांत बांदेकर (वय ३५) अत्यवस्थ आहेत. तर अंजली (वय ८) आणि अनन्या (वय ४) यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. दरम्यान, मुलींना विष देऊन अनिल याने विषप्राशन कशासाठी केले, याचे कारण स्पष्ट झालेले नाही.

याबाबत माहिती अशी की,

कंग्राळी के. एच. येथील रहिवासी अनिल चंद्रकांत बांदेकर याला अंजली आणि अनन्या या दोन मुली आहेत. दोन्ही मुलींना पहिल्यांदा विष पाजविले आणि त्यानंतर बांदेकर याने विषप्राशन केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील लोक जमले. त्यानंतर तिघांना जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले. तिघांपैकी चिमुरड्यांचा मृत्यू झाला. तर मुलींचे वडील अत्यवस्थ असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.अत्यवस्थ अनिल याची पत्नी परगावी आहे. तर घरात अनिल आणि मुली होत्या.

दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मुलींना बळजबरीने विष पाजविले व त्यानंतर स्वतः विष प्यायले. याची कुणकुण आजूबाजूला राहणाऱ्यांना लागताच घरात प्रवेश केला. त्यावेळी तिघेही अत्यवस्थ अवस्थेत पडल्याचे दिसून आले. लोकांनी वैद्यकीय उपचारासाठी तिघांना दाखल केले. त्यापैकी मुलींचा मृत्यू झाला होता. वडिलावर उपचार सुरू असून प्रकृती अत्यस्वस्थ असल्याचे पोलिसांनी संगितले. अनिल बांदेकर बांधकाम कामगार असून, फरशी फिटिंगचे काम करतो. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एपीएमसी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून माहिती घेतली. रात्री उशिरा एपीएमसी पोलिस ठाण्यात याची नोंद आहे.

हेही वाचा- आता चहा ठरणार 'गुणकारी'; लहान मुलांवरील संशोधनात मोठं यश

विषप्राशनाने दोन मुलींचा मृत्यू झाला असल्याची घटना कंग्राळी के. एच. येथे घडली आहे. वडिलाने मुलींना विष पाजविले आणि त्यानंतर स्वतः विष पिले. यात मुलींचा मृत्यू झाला असून, वडील अत्यवस्थ आहे. यामागील नेमके कारण स्पष्ट नाही; परंतु खुनाचा गुन्हा एपीएमसी पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.

- एन. व्ही. बरमणी, एसीपी

loading image