पोलिस स्टेशन आवारात फिल्मी स्टाईने रस्त्यावर दोन गटाची भांडणे

crime.gif
crime.gif

मंगळवेढा :  तालुक्यातील ढवळस ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत झालेल्या वादातून पोलिस ठाणे आवारातच गैरकायद्याची मंडळी जमवून दोन गटात फिल्मी स्टाईलने दगडाने मारहाण करून एकमेकांना जखमी केल्याप्रकरणी विद्यमान सरपंच तथा पंढरपूर येथील एका महाविद्यालयाचे प्राध्यापक सिध्देश्वर मोरे व शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष सिध्देश्वर हेंबाडे यांच्यासह  23 लोकांविरूध्द गुन्हा दाखल झाला. दरम्यान या प्रकरणात पोलिस अटक केलेल्या 11 जणांना तीन दिवसाची पोलिस कोठडी न्यायाधीश ए बी मडके यांनी सुनावली.

19 ऑगस्टला ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित केलेल्या ग्रामसभेत गावातील सिध्दराम भानुदास हेंबाडे व इतरांनी कार्यक्रम पत्रिकेवर विषय का घेतल्याच्या कारणावरून वाद गावात झाला होता. या वादाची तक्रार देण्यासाठी तुम्ही पोलिस ठाण्यात का आला असे म्हणून पंपूशेठ मोरे यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे सोन्याचे लॉकेट तसेच खिशातील मोबाईल जबरदस्तीने घेतल्याप्रकरणी रतिलाल भानुदास हेंबाडे, शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष सिध्देश्वर भानुदास हेंबाडे, आनंद ज्ञानेश्वर मोरे, नवनाथ सिद्राम हेंबाडे, जयदीप जयनारायण हेंबाडे, आबासाहेब सौदागर मोरे, सुनिल बाबा शेजाळ, बन्सीलाल भानुदास हेंबाडे, अमित ज्ञानेश्वर मोरे, विशाल आनंदा हेंबाडे, बन्सीलाल भानुदास हेंबाडे, दिपक चिंतामणी हेंबाडे, प्रकाश दासा हेंबाडे आदींविरूध्द गुन्हा दाखल झाला असून याची फिर्याद सिध्देश्वर मारूती मोरे यांनी दिली आहे.

तर दुसर्‍या घटनेत विद्यमान सरपंच तथा प्राध्यापक सिध्देश्वर मारूती मोरे, मंगेश ज्ञानदेव मोरे, अमोल आबासाहेब मोरे, पंपू नामदेव मोरे, आबासाहेब संभाजी मोरे, महादेव मच्छिंद्र मोरे, छगन मारूती मोरे, वसंत मारूती मोरे, सुनिल दिलीप मोरे, तात्या राजाराम मोरे आदींनी गैरकायद्याची मंडळी जमवून रतिलाल हेंबाडे, नवनाथ हेंबाडे, जयदीप हेंबाडे, अमित मोरे, आनंदा मोरे यांना मारहाण करून सॅमसंग व इंटेक्स कंपनीचे दोन मोबाईल तसेच दोघांच्या गळ्यातील सोन्याची चैन या वस्तू हिसकावून आरोपींनी घेतल्याचे सिध्देश्वर हेंबाडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, दोन गटाची भांडणे पोलिस स्टेशन आवारात फिल्मी स्टाईने झाल्यामुळे रस्त्यावरून बघ्यांची गर्दी जमली होती. हा प्रकार पोलिस ठाण्याच्या तिसऱ्या डोळ्यात कैद झाला. या झालेल्या भांडणामुळे खाकी वर्दीचा वचक या लोकांना आहे की नाही?असा सुर नागरिकांतून व्यक्त होवू लागला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com