बारावीचे दोन विद्यार्थी मंगळवारपासून बेपत्ता

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

कोल्हापूर - बारावी परीक्षेचा क्रमांक कोठे आला, हे पाहण्यासाठी जातो, असे सांगून मंगळवारी (ता. १९) बाहेर पडलेले दोन विद्यार्थी बेपत्ता झाले. सौरभ सुहास घोदे (वय १८, रा. शिंदे कॉलनी, नागदेववाडी रिंगरोड) आणि पुष्पेंद्रसिंह इबरसिंह राजपूत (१८, रा. उत्तरेश्‍वर पेठ) अशी त्यांची नावे आहेत. याची करवीर पोलिसांत नोंद झाली. 

याबाबत माहिती अशी  सौरभ घोदे व पुष्पेंद्रसिंह राजपूत हे दोघे वर्गमित्र आहेत. शाहूपुरीतील एका कनिष्ठ महाविद्यालयाच्या बारावी विज्ञानच्या वर्गात शिकतात. अभ्यासासाठी पुष्पेंद्रसिंह हा सौरभच्या घरी जात होता. मंगळवारी सकाळी तो सौरभच्या घरी गेला. दुपारी दोघे सौरभच्या आईला परीक्षेचा क्रमांक कोणत्या महाविद्यालयात आला आहे, ते पाहून येतो, असे सांगून घरातून बाहेर पडले. उशीर झाला तरी ते घरी परतले नाहीत. त्या दोघांचे मोबाईलही ‘स्विच ऑफ’ लागले. त्यांची शोधाशोध सुरू करण्यात आली. मात्र, ते मिळाले नाहीत. याची फिर्याद करवीर पोलिस ठाण्यात देण्यात आली. 

बेपत्ता झालेल्या सौरभची उंची पाच फूट असून, मध्यम बांधा, वर्ण निमगोरा, अंगात काळी जीन्स, पांढरा टी शर्ट व तपकिरी रंगाचे स्वेटर त्याने परिधान केले आहे. पुष्पेंद्रसिंहची उंची पाच फूट असून, लाल रंगाचा टी शर्ट व काळ्या रंगाची जीन्स त्याने परिधान केली आहे. याबाबत माहिती मिळाल्यास संबंधितांनी करवीर पोलिसांशी संपर्क साधावा.

Web Title: Two HSC students missing since Tuesday