
Vehicle crash in Kalambi, Miraj area leaves two dead after collision with electric pole; police on site.
Sakal
मिरज : कळंबी (ता. मिरज) व मिरज शहरातील वंटमुरे कॉर्नर येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघे ठार झाले. यात सांगली-मिरज रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या एका चारचाकीवरचे चालकाचे नियंत्रण सुटून ती विद्युत खांबावर जोरात आदळल्यामुळे विश्वजित दिलीप नाईक (वय २१, शंभर फुटी, डी मार्टमागे, सांगली) याचा मृत्यू झाला, तर या चारचाकीमधील ओमकार सुनील पाटील, वैभव नंदकुमार पाटील आणि अनिकेत आशिष कुमामेकर (सर्व डी मार्टच्यामागे, सांगली) जखमी झाले.