
सांगलीत मध्यरात्री नेमकं काय घडलं?
esakal
हायलाइट्स (Highlight Summary – 3 Points)
एअरगन व चाकूच्या धाकाने बंगल्यात घुसलेले दोघे गुन्हेगार पकडले
दसऱ्याच्या रात्री अंबाईनगरमधील शहा यांच्या बंगल्यात जबरी चोरीचा प्रयत्न झाला; मात्र कुटुंबाच्या प्रसंगावधानामुळे चोरटे नागरिकांच्या हाती सापडले.
नागरिकांचा बेदम चोप, पोलिसांनी वाचवले प्राण
संतप्त जमावाने दोन्ही चोरट्यांना बेदम मारहाण केली; सांगली शहर पोलिसांनी वेळेवर धाव घेत त्यांना जमावाच्या तावडीतून सोडवले.
सौरभ कुकडे व रोहित कटारे अटकेत; सहा ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
दोघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून न्यायालयाने सहा ऑक्टोबरपर्यंत कोठडीचा आदेश दिला.
Sangli Police : सांगली शहरातील रतनशीनगरजवळच्या अंबाईनगरमध्ये गुरुवारी (ता. २) रात्री पावणेदहाच्या सुमारास एका बंगल्यात घुसून एअरगन व चाकूच्या धाकाने दोघा गुन्हेगारांनी जबरी चोरीचा प्रयत्न केला. मात्र कुटुंबाच्या प्रसंगावधानामुळे शेजाऱ्यांना हा प्रकार समजला. त्यामुळे जमाव गोळा झाला आणि त्यांनी दोघांना बेदम चोप दिला. शहर पोलिस वेळीच घटनास्थळी पोहोचल्याने दोघे बचावले. संशयित सौरभ रवींद्र कुकडे (दत्तनगर, सांगली), रोहित बंडू कटारे (फौजदार गल्ली) यांना अटक केली आहे.