परदेशवारीनंतरही सुरु ठेवले दवाखाने... मग काय झाले?

Two private hospitals sealed in  Miraj
Two private hospitals sealed in Miraj

मिरज, ता. 28 : परदेशी प्रवासानंतरही रुग्णांची तपासणी सुरू ठेवणाऱ्या मिरज शहरातील दोन डॉक्‍टरांच्या खासगी रुग्णालयांना महापालिकेने सील ठोकले. 

याबाबत महापालिका प्रशासनाने दिलेली माहिती अशी, मिरज शहरात स्त्रीरोग तज्ज्ञ आणि बालरोगतज्ज्ञ म्हणून व्यवसाय करणारे दोघे डॉक्‍टर नुकतेच परदेश प्रवास करून आले आहेत. यापैकी एका डॉक्‍टरच्या हातावर विमानतळावरच "होम क्‍वारंटाईन'चा शिक्का मारण्यात आला.

दुसरा डॉक्‍टर श्रीनिवास 7 मार्च रोजी परदेश प्रवासाहून आल्याने आणि त्यावेळी "कोरोना'बाबत एवढी भीती नसल्याने किंबहुना त्यांना कोणताही "अलगीकरणाचा' सल्ला मिळाला नव्हता. त्यांनी त्यांचे बाल रुग्णालय सुरू ठेवले. याबाबतची तक्रार महसूल प्रशासनाकडे दाखल झाली. महसूल प्रशासनाने याबाबत तपासणी करून कारवाई करण्याचे आदेश महापालिकेस दिले.

या आदेशास अनुसरून महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील, आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी आज ही कारवाई केली. यामध्ये दोन्ही डॉक्‍टरांच्या रुग्णालयांना 10 एप्रिलपर्यंत सील ठोकण्यात आले. या दोघाही डॉक्‍टरांना 10 एप्रिलनंतर तपासणी करून रुग्णालय सुरू करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने दिले आहेत. या कारवाईमुळे परदेश प्रवास करून आलेल्या शहरातील अनेक व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com