दोन बहिणींनीच केला कुटुंबातील तिघांचा खून 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

सोलापूर - तिऱ्हे (ता. उत्तर सोलापूर) येथील सिद्धनाथ साखर कारखाना परिसरातील तिहेरी खून प्रकरणात धक्कादायक माहिती सोमवारी समोर आली. धुना आणि वसन जाधव या बहिणींनीच आई, भाऊ आणि बहिणीचा खून केल्याची कबुली दिली आहे. 

सोलापूर - तिऱ्हे (ता. उत्तर सोलापूर) येथील सिद्धनाथ साखर कारखाना परिसरातील तिहेरी खून प्रकरणात धक्कादायक माहिती सोमवारी समोर आली. धुना आणि वसन जाधव या बहिणींनीच आई, भाऊ आणि बहिणीचा खून केल्याची कबुली दिली आहे. 

शुल्लक कारणावरून धुना आणि वसन या दोघींना कुटुंबातील सदस्यांकडून मारहाण केली जायची. त्यांना पसंत नसलेल्या ठिकाणी लग्न करण्याचा तगादा लावला होता. या कारणावरून दोघी बहिणींनी तिघांना संपविले. घटनेच्या एक दिवस आधी भाऊ मफा याने मारहाण केल्यानंतर चिडलेल्या धुनाने चोवीस तासांत बदला घेण्याची धमकी दिली होती. मूळचे गुजरातचे असलेले रणसोड जाधव आणि त्यांचे कुटुंबीय सिद्धनाथ साखर कारखाना परिसरात राहायला होते. रणसोड जाधव कामानिमित्त नागपूरला गेले होते. धुना व वसन यांनी शुक्रवारी (ता. 6) पहाटे आई हयातबाई, बहीण लाखी व भाऊ मफा या तिघांचा खून झाला होता. यानंतर त्या बेपत्ता झाल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखा आणि तालुका पोलिस ठाण्याचे पथक या गुन्ह्याचा शोध घेत होते. 

अशी झाली अटक 
धुना आणि वसन या दोघी बसने तुळजापूर बस स्थानकावर गेल्याची माहिती पोलिसांना समजली. तेथून त्या दोघी पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसने गेल्याचे कळाले. त्या बसचालक आणि वाहकास सांगून बस थेट यवत पोलिस ठाण्यात नेण्यात आली. तिथे पोलिसांनी दोघी बहिणींना ताब्यात घेतले.

Web Title: Two sisters killed three family members