वाळू चोरीप्रकरणी दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जुलै 2018

मुंगी परिसरात ट्रॅक्‍टरला आऱ्या जोडून गोदावरी नदीपात्रातून बेसुमार अवैध वाळू उपसा करीत असताना कल्याण मधुकर गव्हाणे (वय 28) व श्रीधर भानुदास रक्‍टे (दोघेही रा. मुंगी, ता. शेवगाव) यांना दोन ट्रॅक्‍टरसह ताब्यात घेण्यात आले आहे.

शेवगाव : मुंगी परिसरात ट्रॅक्‍टरला आऱ्या जोडून गोदावरी नदीपात्रातून बेसुमार अवैध वाळू उपसा करीत असताना कल्याण मधुकर गव्हाणे (वय 28) व श्रीधर भानुदास रक्‍टे (दोघेही रा. मुंगी, ता. शेवगाव) यांना दोन ट्रॅक्‍टरसह ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई पोलिस उपविभागीय अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या प्रकरणी पोलिस कॉ. सोमनाथ माणिक घुगे यांच्या फिर्यादीवरून विनापरवाना बेकायदा वाळू उपसा करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंगी येथील गोदावरी नदीपात्रातून ट्रॅक्‍टरला आऱ्या लावून वाळूउपसा सुरू असल्याची माहिती पोलिस उपविभागीय अधिकारी मंदार जवळे यांना गुप्त खबऱ्याकडून मिळाली. त्यांनी स्वत: सात जणांच्या पथकासह रविवारी (ता. 22) दुपारी 12 वाजता छापा टाकला. त्या वेळी कल्याण गव्हाणे व श्रीधर रक्‍टे हे दोघे विनानंबरच्या ट्रॅक्‍टरला आऱ्या लावून पाण्यातून वाळूउपसा करताना आढळून आले. वाळूउपसा करण्याचा त्यांच्याकडे परवाना नसल्याने दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून दोन ट्रॅक्‍टर व दोन आऱ्या असा एकूण 8 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Web Title: two of them are arrested for the sand theft