दरोड्याच्या तयारीतील दोघांना शस्त्रांसह पकडले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीवर पोलिसांनी छापा घातला. दोघांना पकडण्यात यश आले.

राशीन - खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीवर पोलिसांनी छापा घातला. दोघांना पकडण्यात यश आले; मात्र तिघे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. ही घटना काल रात्री आठच्या सुमारास राशीन-कुंभारगाव रस्त्यावरील पवारवाडी शिवारात घडली. 
अमोल लाला काळे (वय 20, रा. पोमलवाडी, ता. करमाळा) व नितीन शिंदे (वय 19, रा. बाळेवाडी, ता. करमाळा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून धारदार गुप्ती व सुरा आणि तीन मोटरसायकली पोलिसांनी ताब्यात घेतल्या. बापू बाळासाहेब काळे व महापूर लाला काळे (दोघेही रा. पोमलवाडी, ता. करमाळा) आणि गोरख गुलांड्या भोसले (रा. टाकळी, ता. करमाळा) हे तिघे पळून गेले. 

पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे, गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक दिलीप पवार, उपनिरीक्षक वैभव महांगरे, कॉन्स्टेबल मच्छिंद्र जाधव, सुग्रीव गडकर, दत्तात्रेय हिंगडे, योगेश गोसावी, रावसाहेब हुसळे, सचिन कोळेकर यांनी हा छापा घातला. काळे व शिंदे यांना आज कर्जतच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. आर. माळवदे यांनी तीन तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

Web Title: Two thief were caught with weapons

टॅग्स