जोतिबा डोंगरावरील घाटात दोन ट्रक कचरा !

निवास मोटे
मंगळवार, 2 एप्रिल 2019

जोतिबा डोंगर - येथील घाटात मुदत संपलेले प्लास्टिक पिशव्यातील पशुखाद्य टाकण्यात आले आहे. विशेष म्हणजे या पिशव्यांचा दोन ट्रक इतका कचरा येथील घाटात ओतण्यात आला आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. हा कचरा टाकणाऱ्यांवर त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थ व भाविकांतून होत आहे.

जोतिबा डोंगर घाट सध्या टाकाऊ वस्तू टाकण्याचे ठिकाण झाले आहे. या ठिकाणी ओला कचरा, वैद्यकीय कचरा तसेच विविध टाकाऊ वस्तू आणून ओतण्यात येत आहेत. त्यामुळे घाटातून येणाऱ्या भाविकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतोय. 

या कचऱ्यामुळे पशू, पक्षी, मोकाट जनावरांना धोका निर्माण झाला आहे. या पिशव्या वाऱ्यामुळे सर्वत्र अस्ता व्यस्त पडलेल्या आहेत. जोतिबाची चैत्र यात्रा पंधरवड्यावर आली आहे. या यात्रेसाठी कर्नाटक, बेळगाव येथील २५ बैलगाड्या डोंगरावर येतात. तसेच  नंदी, गाय, बैल त्याच्या सोबत असतात.  जर हा टाकलेला कचरा बैलांनी  खाल्ला तर त्यांच्या जीवितास धोका आहे. त्यामुळे चैत्र यात्रेपूर्वी हा कचरा संबंधित यंत्रणेने काढून टाकावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

जोतिबाच्या घाटातून दररोज हजारो भाविक दर्शनासाठी डोंगरावर जातात . या घाटात काही माहिन्यांपासून सर्व प्रकारचा कचरा टाकून दिला जातो. यामुळे घाटात दुर्गंधी सुटते. भाविकांना त्रास सहन करावा लागतो. चैत्र यात्रेपूर्वी या कचऱ्याची विल्हेवाट लावावी .

 - आनंदराव पाटील, ग्रामस्थ, कुशिरे तर्फ ठाणे ता .पन्हाळा 

Web Title: Two truck garbage in Jotiba hill