मोहोळमध्ये दोन ऊसतोडणी कामगार बेपत्ता

मोहोळमध्ये दोन ऊसतोडणी कामगार बेपत्ता

मोहोळ : ऊसतोडणीसाठी कारखान्यावर आलेल्या गटातील एक नवविवाहिता व एक तरूण असे दोघेजण बेपत्ता झाल्याची घटना आज (मंगळवार) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची नोंद मोहोळ पोलिसांत झाली आहे.

मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनगर येथील लोकनेते साखर कारखान्यावर ऊस तोडणीसाठी बारा जणांची टोळी अंबेजोगाईवरून एक महिन्यापूर्वी  आली. मोहोळ येथील गाढवे वस्ती व माने वस्ती या ठिकाणी या टोळीची ऊसतोडणी सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी मोहोळ तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने ऊसतोडणी बंद झाली.

या गटाचे प्रमुख माधव सुरनर हे मजुरांना लागणाऱ्या वस्तूखरेदी करण्यासाठी गेले होते. या संधीचा फायदा घेऊन शुभम् विलास भोसले (20 ) (रा. वडरगल्ली, बीड) व 20 वर्षीय नवविवाहिता असे दोघेजण बेपता झाले. दरम्यान, त्या दोघांचा सर्वत्र शोध घेतला असता ते सापडले नाहीत. या दोघांचेही प्रेमसंबंध असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. 

या घटनेची माहिती गटप्रमुख माधव व्यंकटी सूर नर (रा. दगडवाडी ता. अंबेजोगाई) याने मोहोळ पोलिसांत दिली आहे. या प्रकरणाचा तपास मोहोळ पोलिस करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com