चर्चाच चर्चा : विद्यार्थीनीशी लगट दाेन शिक्षकांच्या अंगलट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

तिन्ही शिक्षकांना जिल्हा परिषदेेने अंतिम कारणे दाखवा नोटीसा बजावली हाेती. त्यामध्ये खुलासा सादर करण्याची सूचना करण्यात आली होती. पण त्यांनी केलेला खुलासा समाधानकारक नसल्याने शिक्षकांवर कारवाई करण्यात आली.

सातारा :  जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात चुकीचे काम करणार्‍या शिक्षकांवर चौकशीत दोषी आढळलेल्या तीन शिक्षकांवर कारवाईचा बडगा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी उगारला आहे.  त्यांनी दोन शिक्षकांना सक्तीने बडतर्फ केले आहे. तर एका शिक्षकाची अन्य तालुक्यात बदली केली आहे. या कारवाईमुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

कोरेगाव पंचायत समितीत भगवान बाबासो लोहार हे निलंबीत उपशिक्षक आहेत. शाळेतील गैरवर्तणुकीबाबत त्यांना निलंबीत करुन त्यांची खातेनिहाय चौकशी, विभागीय आयुक्त चौकशी करण्यात आली होती. विभागीय चौकशीमध्ये ते दोषी आढळून आले. त्यांच्यावर उंब्रज पोलीस ठाण्यात शाळेत कार्यरत असताना विद्यार्थीनीशी अश्लिल वर्तन केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. 

वाचा :  बाप हो देव पाहिला का देव ?

हणमंत पांडूरंग कदम केंद्रप्रमुख केंद्र शाळा महिमानगड (ता. माण) यांच्या शालेय कामकाजातील गैरवर्तणूकीबाबत त्यांना निलंबीत करुन त्यांची विभागीय चौकशी करण्यात आली होती. ते जाखणगाव (ता. खटाव) येथे कार्यरत असताना केंद्रातील शिक्षकांबरोबर सौदाहार्यचे संबंध ठेवले नाहीत. पदाचा गैरवापर करुन मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षिका यांना नाहक त्रास दिला, आदी कारणामुळे अंतिम कारणे दाखवा नोटीसा बजावून खुलासा सादर करण्याची सूचना झाली होती. पण त्यांनी केलेला खुलासा समाधानकारक नव्हता. खटाव पंचायत समितीच्या मासिक सभेतही अन्य तालुक्यात बदली करावी असा ठराव घेण्यात आला होता. अखेर त्यांची बदली वडगाव हवेली (ता. कराड) येथे  करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा : बाटली जिंकली... महिला निराश !

चंद्रकांत पांडूरंग राजे हे जिल्हा परिषद शाळा भेकवली (ता. महाबळेश्वर) येथे उपशिक्षक आहेत. त्यांच्यावर गैरवर्तणुकीचा आरोप करण्यात आला होता. शाळेतील गैरवर्तणुकीबाबत त्यांना निलंबीत करुन त्यांची खाते निहाय चौकशी सुरू होती. शाळेतील विद्यार्थीनीशी गैरवर्तन केल्याचा आरोप त्यांच्याबाबत सिद्ध झाला असून जिल्हा परिषद सेवेतून बडतर्फ का करण्यात येवू नये?, अशी अंतिम कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा सादर करण्यास कळवले होते. खुलासा समाधानकारक न आल्याने त्यांना सक्तीने सेवा निवृत्त करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा : रायबाच्या शिक्षणासाठी लाखमोलाची मदत; तानाजी मालुसरेंच्या कुटुंबियांची भावना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Zilla Parishad Teachers Removed From Job In Satara