'आयुष्यमान भारत' योजना : नगर मध्य् दोन लाख 66 हजार 370 लाभार्थीं

मार्तंड बुचुडे
बुधवार, 23 मे 2018

पारनेर : केंद्र सरकराच्या 'आयुष्यमान भारत' या योजनेत नगर जिल्ह्यातील दोन लाख 66 हजार 370 लाभार्थी  आहेत.केंद्र सरकार  या  कुटुंबांना आजारी पडल्यास प्रतिकुटुंब पाच लाख रूपयांपर्यंत मदत करणार आहे. मात्र सध्या ही योजना प्राथमिक पातळीवर असून लाभार्थी असणा-या कुटुंबांची पडताळणी ग्रामसभामधून त्या तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत सुरू आहे.

केंद्र सरकार शहरी व ग्रामिण भागातील दारिद्र रेषेखालील व आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबासाठी ही आरोग्य विमा योजऩा सुरू करणार आहे. या योजणेतून एका लाभार्थी कटुंबाला आजारी पडल्यास पाच लाख रूपयांपर्यंतची आर्थिक मदत मिळणार आहे.  ही आरोग्य विमा योजऩा केंद्र सरकारची असून केवळ आजारी पडल्यानंतर दवाखाण्यातील बिलापोटी ही आर्थिक मदत संबधित कुटुंबांना मिळणार आहे. या साठीची लाभार्थी हे 2011 साली झालेल्या जणगणनेतून निवडण्यात आली आहेत. या लाभार्थींचे संकलन सध्या आरोग्यविभाग मार्फत जिल्ह्यात सुरू आहे. या लाभार्थींच्या कुटुंबांचे संकलन पारनेर तालुक्यात करण्यात येत असून तालुक्यातील भाळवणी, अळकुटी, निघोज, पळवे, कान्हूर पठार, रूईछत्रपती व खडकवाडी या सात प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत करण्यात आले आहे. 

  • पारनेर-131 गावे,
  • यादीतील लाभार्थी कुटुंब संख्या- 13628,
  • ग्रामसभेत माहीत संकलन झालेली कुटुंबे- 13199,
  •  अदयाप माहीती संकलन राहिलेली कुटुंब संख्या- 429. 

    गोरगरीब व आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी 'आयुष्यमान भारत' ही अतिशय चांगली आरोग्य विमा योजना आहे. मात्र अद्याप ही योजऩा सुरू झाली नाही. सध्या केंद्र सरकारकडून मिळालेली यादी गावोगाव जाऊन तपासली जात आहे. याचा जनतेला चांगला फायदा होणार आहे अनेकांना यामुळे जिवनदान मिळणार आहे. -- डॉ. वशीम शेख, जिल्हा समन्वयक, नगर.

Web Title: tywo lakh 66 thousand 370 of ayushman bharat scheme beneficiaries in the Nagar