चला, आजपासून साधूया संवाद ध्‍येयवेड्यांशी...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 फेब्रुवारी 2019

कोल्हापूर - शालेय विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठांपर्यत प्रत्येकाच्या मनामनात नवप्रेरणा जागवणाऱ्या ‘ऊर्जा - संवाद ध्येयवेड्यांशी’ या संवादमालिकेला गुरुवार (ता. २८) पासून दिमाखदार प्रारंभ होणार आहे. 

संजय घोडावत ग्रुप स्टार एअर प्रस्तुत या संवादमालिकेचे पहिले पुष्प प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे गुंफणार आहेत. ‘सकाळ माध्यम समूह’ आणि शिवाजी विद्यापीठाच्या संयुक्त सहकार्याने सलग पाचव्या वर्षी हा उपक्रम आयोजित केला आहे. 

शिवाजी विद्यापीठाच्या लोककला केंद्रात सलग चार दिवस ही मालिका रंगणार असून रोज सायंकाळी सहा वाजता संवादाला प्रारंभ होईल. दरम्यान, या उपक्रमासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश असेल. शिवाजी विद्यापीठाचे विशेष सहकार्य मिळाले आहे.

नववर्षाचा प्रारंभ आणि ‘सकाळ’चा ‘ऊर्जा’ हा उपक्रम हे आता एक समीकरणच झाले असून, विविध क्षेत्रांतील यशोलौकिकाच्या शिलेदारांशी संवाद साधण्याची ही एक पर्वणी असते. यंदाच्या उपक्रमाचे पहिले पुष्प गुंफताना प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे यांच्या आजवरच्या प्रवासातील विविध पदर उलगडतीलच. त्याशिवाय या प्रवासात आलेल्या विविध अडचणी, संकटांवर त्यांनी कशी मात केली, याच्या टिप्सही मिळणार आहेत.

शुक्रवारी (ता. एक) सांगलीचे पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा, शनिवारी (ता. दोन) पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे, रविवारी (ता. तीन) महिला उद्योजिका जयंती कठाळे यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. चला तर मग, यशोलौकिकाच्या शिलेदारांशी संवाद साधूया... प्रत्येक संवादातून सळसळती ऊर्जा घेऊया...!

प्रायोजक असे... 
टायटल स्पॉन्सर - संजय घोडावत ग्रुप स्टार एअर 
सहप्रायोजक - तनिष्क शोरूम, चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन, मार्व्हलस इंजिनीअर्स 
हॉस्पिटॅलिटी पार्टनर - हॉटेल सयाजी 
ट्रॅव्हल पार्टनर - मोहन ऑटो इंडस्ट्रीज प्रा. लि. 
फर्निचर पार्टनर - लकी फर्निचर 

सर्वांना विनामूल्य प्रवेश
गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर पार्किंगची नेटकी व्यवस्था
दररोज सायंकाळी सहाला संवादाला प्रारंभ
मोफत सन्मानिका असणाऱ्यांना प्रथम प्राधान्य
मुलाखतीनंतर प्रश्‍न विचारण्याची संधी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uarja Dialogue Serial Subodh Bhave