साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसलेंचा करिष्मा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

सातारा : साताऱ्यात नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदाच्या 40 पैकी 22 जागांवर मोठ्या मताधिक्‍याने विजय मिळवत खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील सातारा विकास आघाडीने सातारा पालिकेवर आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.

"साविआ'च्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार माधवी कदम यांनी "नविआ'च्या वेदांतिकाराजे भोसले यांचा 3 हजार 305 मतांनी पराभव केला. भाजपचे सहा नगरसेवक निवडून आले. नगर विकास आघाडीला अवध्या 12 जागांवर समाधान मानावे लागले.
माजी नगराध्यक्ष विजय बडेकर, माजी उपाध्यक्ष ऍड. दत्ता बनकर, जयेंद्र चव्हाण, अविनाश कदम, विरोधी पक्षनेते ऍड. बाळासाहेब बाबर या दिग्गजांना पराभवाला समोरे जावे लागले.

Web Title: udayan raje shows karishma in satara again