...जेव्हा उदयनराजे व्यासपीठावर गाणं गातात(व्हिडिओ)
उत्कृष्ट पत्रकार सन्मान पुरस्काराच्या कार्यक्रमात खासदार उदयनराजे यांनी गाणं म्हटल्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. व्यासपीठावर बोलत असताना त्यांनी उपस्थितांना प्रश्न केला की, तुम्हाल गाणं ऐकायचे आहे का? बराच वेळापासून सगळ्यांची भाषणं चालू आहेत तुम्हाला कंटाळा आला असेल, असे म्हणत उदयनराजेंनी थेट गाणं गायला सुरवात केली.
सातारा- आज (ता.12) उत्कृष्ट पत्रकार सन्मान पुरस्काराच्या कार्यक्रमात खासदार उदयनराजे यांनी गाणं म्हटल्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. व्यासपीठावर बोलत असताना त्यांनी उपस्थितांना प्रश्न केला की, तुम्हाल गाणं ऐकायचे आहे का? बराच वेळापासून सगळ्यांची भाषणं चालू आहेत तुम्हाला कंटाळा आला असेल, असे म्हणत उदयनराजेंनी थेट गाणं गायला सुरवात केली.
सातारा नगरपरिषदेचा कै. प्रतापसिंह महाराज कला-क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 2019 चा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार आज (ता.12) संग्राम निकाळजे यांना देण्यात आला. शाहू कला मंदिरात झालेल्या कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सातारा नगरपालिकेने यावर्षापासून प्रतापसिंह महाराज कला-क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 2019 अंतर्गत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या प्रतिभावंतांना पुरस्कार देण्यास सुरुवात केली आहे. यावर्षी सातारा शहरातील पत्रकारितेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या 11 पत्रकारांना पुरस्कार देण्यात आले. यामध्ये जयवंत गुजर, संग्राम निकाळजे, पांडुरंग पवार, मोहन पाटील, दीपक दीक्षित, आदेश खताळ, विशाल कदम, तुषार तपासे, छायाचित्रकार प्रमोद इंगळे, जावेद खान, गुरुनाथ जाधव यांना यावर्षीचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देण्यात आले.
यावेळी राजमाता जिजाऊ पुरस्कार 2019, स्वामी विवेकानंद पुरस्कार-2019 अंतर्गत ललिता केशव, सोनाली हेळवी, आर्या देशपांडे, वैष्णवी पवार, सुदेष्णा शिवणकर, मयुरी देवरे, मोहन घोरपडे, इशान शानभाग, यश राजेमहाडिक, तेजराज मांढरे, यासीर मुलाणी या क्रीडा व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
लोकनियुक्त पहिले नगराध्यक्ष प्रतापसिंह महाराज पुरस्कार पाचगणी व कराड नगरपरिषदेला प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला सातारासह जिल्ह्यातील अनेकांनी उपस्थिती लावली होती. यावेळी खा. उदयनराजे भोसले, कल्पनाराजे भोसले, नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, मुख्याधिकारी शंकर गोरे, पाचगणीच्या नगराध्यक्षा लक्ष्मी कराडकर, कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, सातारा पत्रकार संघाचे विनोद कुलकर्णी आदी उपस्थित होते.