उदयनराजेंचा राष्ट्रवादीनेच केला होता दोनवेळा पराभव...

Udayanraje (2)
Udayanraje (2)

सातारा : साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे आपल्या खासदारकीचा राजीनामा देत भारतीय जनता पक्षाच्या गोटात सामील झाले आहेत. त्यांनी राजीनामा दिल्याने सातारा लोकसभा मतदारसंघातील लोकांना पुन्हा निवडणुकीला समोरे जावे लागणार आहे. भारतीय जनता पक्षाकडून सार्वधिक मतांनी उदयनराजेंना निवडून आणण्याचा दावा केला जात असला तरी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून उदयनराजेंना आम्ही पराभूत करू असा दावा केला जात आहे, सोबतच 1999 विधानसभा निवडणुकीत उदयनराजेंचा केलेल्या पराभवाची आठवण करून देण्यात येत आहे.

राष्ट्रवादीच्या उमेदवाराने त्यांचा पराभव केला होता. 1999 आणि 2004 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये उदयनराजेंना दोन वेळा पराभवाचा सामना करावा लागला होता. विशेष म्हणजे त्यावेळी उदयनराजे हे भाजपाचे उमेदवार होते.

मुख्यमंत्र्यांनी साताऱ्यात शब्द पाळला

राज्यात सन १९९५च्या युतीचे सरकार असताना माजी मंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या आवाहनानंतर उदयनराजे भोसले भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यावेळी त्यांना महसूल राज्यमंत्रीही करण्यात आले. मात्र, त्यानंतर 1999 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले यांना साताऱ्यातून पराभवाचा झटका बसला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अभयसिंहराजे भोसले यांनी त्यांचा पराभव केला होता.

सांगली- शिराळ्यात भाजपची ताकद वाढली

2004 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंचा पराभव केला होता. त्यानंतर उदयनराजेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, पण काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची चिन्हे दिसत नसल्याने त्यांनी 2008 मध्ये राष्ट्रवादीला जवळ केलं आणि 2009च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकीटावर विजय मिळवला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com