'उदयनराजेंची भूमिका मराठा समाजाची नाही'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 सप्टेंबर 2016

सातारा - दलित- मराठा ऐक्‍याला आज साताऱ्यातून खऱ्या अर्थाला सुरवात होत आहे. मराठा क्रांती मोर्चाला स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष जाहीर पाठिंबा देत आहे. गावा-गावात जाऊन दलित समाजाला मोर्चाची खरी भूमिका सांगणार असून हजारोंच्या संख्येने भिमसैनिक साताऱ्याच्या मोर्चात सहभागी होणार असल्याचे स्वाभिमानी रिपाईचे जिल्हाध्यक्ष रामदास कांबळे यांनी पत्रकार परिषदेत पक्षाच्यावतीने भूमिका जाहीर केली.

ते म्हणाले सोशल मिडियावर दलितांना भडकवणारे झोपडपट्टीत, गावातील दलितांच्या समस्येसाठी काम करत नाहीत. समाजाने त्याकडे लक्ष देऊ नये. खासदार उदयनराजे भोसले यांची ऍट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची भूमिका ही त्यांची वैयक्तिक आहे मराठा समाजाची नाही. त्यातून केवळ तेढच निर्माण होईल. दोन्ही समाजातील लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे असे ही कांबळे यांनी नमूद केले.

Web Title: 'Udayanarajenci no role for the Marathas'