दोघेही आले एकत्र; अबोला मात्र कायम!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

सातारा - काकांवरील, तसेच क्रीडा क्षेत्रावरील प्रेमातून खासदार उदयनराजे व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे दोन्ही नेते आपला राजकीय पिंड बाजूला ठेवत काल (रविवारी) छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात एकत्र आले. मात्र, स्पर्धकांचे कौतुक करताना दोघांनी आपला रुसवा-फुगवा कायम ठेवला. 

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांचे एकमेकांवर टीका सत्र सुरू आहे. एकमेकांवर वैयक्तिक टिपणीपर्यंत ही टीका पोचली आहे. दोन्ही नेत्यांच्या आरोप- प्रत्यारोपात जिल्ह्याचे राजकारणही ढवळून निघाले आहे. 

भविष्यात दोन्ही नेते एकत्र (मनोमिलन) येणार या चर्चेला तूर्तास तरी शिवेंद्रसिंहराजे यांनी पूर्णविराम दिला होता. त्यातच सातारा जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या जिल्हा अजिंक्‍यपद स्पर्धेच्या बक्षीस समारंभास संघटनेचे प्रमुख ज्येष्ठ नेते शिवाजीराजे भोसले यांनी दोन्ही नेत्यांना निमंत्रित केले. काकांवरील, तसेच क्रीडा क्षेत्रावरील प्रेमातून दोन्ही नेते आपला राजकीय पिंड बाजूला ठेवत रात्री साडेनऊला जिल्हा क्रीडा संकुलात आले. पहिल्यांदा शिवेंद्रसिंहराजे, तर पाच मिनिटांच्या अंतराने उदयनराजे आले. 

बॅडमिंटन कोर्टवरील सर्व क्रीडा रसिकांच्या भुवया उंचावल्या. शिवाजीराजे व शिवेंद्रसिंहराजे ज्या ठिकाणी बसले होते तेथे उदयनराजे गेले. तिन्ही राजे एकत्र आल्याने अनेकांनी मोबाईलमधून छायाचित्र काढली. या काळात 
दोन्ही नेते एकमेकांशी बोलले नाहीत.

मुख्य बक्षीस समारंभात शिवजीराजेंच्या उजव्या बाजूस उदयनराजे, तर डाव्या बाजूस शिवेंद्रसिंहराजे बसले. यशस्वी स्पर्धकांना नेते मंडळींनी बक्षिसे दिली. त्या वेळी काकांनीही दोघांना शाब्दिक टोलेबाजी लगावली. त्यानंतर अनेक स्पर्धकांसोबत दोन्ही नेत्यांनी फोटोसेशन केले. अखेर काकांची परवानगी घेऊन दोन्ही नेते रवाना झाले. 

बॅडमिंटन कोर्टवरील सर्वांना मात्र राजकारणापलीकडचे राजे अनुभवयास मिळाले. या घटनेचा अंदाज कोणाला नव्हता. आता सोशल मीडियावर या दोन्ही नेत्यांची छायाचित्रे व्हायरल होऊ लागली आहेत.

शेजारी-शेजारी बसले, पण...
कार्यक्रमस्थळी आल्यानंतर शिवाजीराजे व शिवेंद्रसिंहराजे ज्या ठिकाणी बसले होते तेथे उदयनराजे गेले. शिवेंद्रसिंहराजे उठले. उदयनराजेंनी शिवाजीराजेंना नमस्कार केला. मुख्य बक्षीस समारंभात शिवजीराजेंच्या उजव्या बाजूस उदयनराजे, तर डाव्या बाजूस शिवेंद्रसिंहराजे बसले. तिन्ही राजे एकत्र आल्याने अनेकांनी मोबाईलमधून फोटो काढले. या काळात दोन्ही नेते एकमेकांशी बोलले नाहीत.

Web Title: udayanraje bhosale and shivendrasinhraje bhosale district sports