जय शिवराय ! अखेर शिवप्रेमींनी करुन दाखवलंच : उदयनराजे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

सध्या मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता असून महाराष्ट्रात काँग्रेस शिवसेनेसह सत्तेत आहे. भारतीय जनता पक्षाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटविल्याचा व्हिडिओ आपल्या फेसबुक पेजवरून शेअर करत सेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचं आराध्यदैवत आहेत. मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथे जेसीबीने ज्याप्रकारे शिवरायांचे स्मारक काढण्यात आले तो प्रकार अतिशय संतापजनक आहे. दरम्यान उदयनराजेंनी याबाबत ट्विटच्या माध्यमातून आपला रोष व्यक्त केला आहे.

मध्य प्रदेशमधील छिंदवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा जेसीबीच्या साह्याने हटवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांतून समोर आला होता. या प्रकारामुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. माजी खासदार उदयनराजे भोसले यांनीही तीव्र शब्दांत या प्रकाराचा निषेध केला आहे. आज (गुरुवार) सकाळी उदयनराजेंनी पून्हा ट्विट करुन स्मारक काढल्याच्या दुसऱ्याच दिवशी हजारो शिवप्रेमींनी महाराजांचा पुतळा पुन्हा त्याच जागेवर विराजमान केला, त्याबद्दल सर्व मावळ्यांचे आभार मानले आहेत. तसेच त्यांनी जय शिवराय ! असंही नमूद केले आहे. 

दरम्यान, महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा मध्य प्रदेशमधील पुतळा पाडण्याचा प्रयत्न करून कॉंग्रेसने महाराजांबद्दल आपलं प्रेम दाखवलंच आहे. आता वेळ आहे शिवसेनेची!! त्यांना महाराज जवळचे वाटतात की सत्तेतला मित्र कॉंग्रेस?, असा सवाल करत भाजपने या प्रकरणी शिवसेनेवर टीका केली आहे.

वाचा : Video : जेसीबीच्या साहाय्याने हटवली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती; शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट!

नक्की वाचा : लई भारी ! विद्यार्थ्यांनी दोन लाख परत केले

जरुर वाचा : सातारकर संतप्त मुलींनी युवकाला चोपले

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udayanraje Bhosale Reaction On Chhindwara Administration For Removing The Statue Of Chhatrapati Shivaji Maharaj By Using JCB