उदयनराजेंच्या इशाऱ्याचा आमदारांना धसका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

सातारा - सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार मीच आहे, असे स्पष्ट करून खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांपुढे प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे.

उदयनराजेंच्या या भूमिकेचा आमदारांनी धसका घेतला असून, प्रत्येकाने आपापल्या मतदारसंघात संपर्कावर भर दिला आहे.

ृसातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असेल, याबाबत खुद्द "राष्ट्रवादी'च्या जिल्ह्यातील नेत्यांत संभ्रमावस्था आहे. या परिस्थितीत खासदार उदयनराजे यांनी "मीच राष्ट्रवादीचा उमेदवार असेन, नसलो तर अपक्ष लढण्याची तयारी आहे,' असे जाहीर करून सर्वांना बुचकळ्यात टाकले आहे. उदयनराजे यांचे थेट शरद पवारांशी असलेल्या संबंधांमुळे जिल्ह्यातील पक्षाच्या नेत्यांपुढे प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. सातारा लोकसभेची उमेदवारी अंतिम करताना जिल्ह्यातील पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विश्‍वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करूनच शरद पवार निर्णय घेतील, असे सर्वांना वाटत आहे.

Web Title: udayanraje bhosale warning MLA politics