माझ्यावरील अन्यायाची काळजी उदयनराजेंनी करु नये : शिवेंद्रसिंहराजे

shivendra-raje
shivendra-raje

सातारा : माझ्यावरच्या अन्यायावर शांत बसणार नाही असे खासदारांनी सांगितले. त्याची काळजी उदयनराजेंनी करु नये. अन्याय होईपर्यंत मी तोंडाकडे बघत बसत नाही हे आता त्यांना पण कळाले आहे. अन्याय होत असताना शांत बसणे हा सर्वांत मोठा मूर्खपणा आहे. अन्यायाला वेळच्या वेळी उत्तर देण्याची भुमिका ही नक्कीच मी घेतली आहे हे उदयनराजेंना पण कळून चुकले आहे. त्यामुळे त्यांनी माझ्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत काळजी करु नये. तसेच देशी दारुच्या दुकानाचा विषय नसून खुटाळेंची जागा मोकळी करुन देण्याची सुपारी उदयनराजेंनी घेतली होती असा आरोप ही त्यांनी केला. 

जुन्या भाजी मंडईसमोरील देशी दारूचे दुकान काढण्यावरून दाखल झालेल्या गुन्ह्यात उदयनराजेंनी गुरुवारी अटकपूर्व जामीन घेतला. त्यानंतर त्यांनी ऑफिसर्स क्‍लब येथे पत्रकारांशी संवाद साधताना शिवेंद्रसिंहराजेंवर अन्याय झाला तरी मीच असेन असे म्हटले होते. त्यावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी "साम मराठी'च्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले हा सर्व विषय स्वतःच्या कार्यकर्त्याची जागा मोकळी करुन देण्याचा विषय आहे. देशी दारुची जागा काढण्याचा हा मुद्दा नसून जागा मोकळी करुन देण्याची ही सुपारी होती. लोकांची अपेक्षा असते लोकप्रतिनिधींनी खर बोलावे. खासदारांनी जे आहे ते खर सांगायला हवे होते.

खूटाळेंची जागा धाकदपटशाही, दंडेलशाही, दहशत करुन त्या दिवशी मोकळी करुन द्यायची हा नियोजीत प्लॅन खासदार व त्यांच्या समर्थकांचा होता. पालिकेची सत्ता आपली वापरायाची. फक्त रवी ढोणेंबरोबर मी आणि आमचे सर्वबाकीचे कार्यकर्ते व पोलीस यंत्रणा तेथे आल्याने खासदारांचा हा प्लॅन सक्‍सेफुल झाला नाही ही वस्तुस्थिती आहे. देशी दारु दुकानामुळे लोकांना त्रास होतोय, महिलांना त्रास होतोय, मंडईत महिला येतात. हे त्यांचे म्हणणे चांगले आहे दुकान बंद व्हावे. माझे असे म्हणणे आहे तत्व. खासदारांनी संपुर्ण लोकसभा मतदारसंघातील देशी दारुची दुकाने बंद करण्याची मोहिम हाती घेऊन आपली तत्व दाखवून द्यावे. केवळ रवी ढोणेच्या दुकानापुरते आपले तत्व आणि त्याची भाषा करु नये. त्या जागेवर केवळ ढोणेच्या दुकानावर नसून संपुर्ण जागेवर आहे. अतिक्रमण काढण्यासाठी शासकीय यंत्रणा आहे. त्यांच्या दडपशाहीला माझा विरोध होता. उद्या कोणी ही त्यांच्याकडे जाईल आणि माझी जागा मोकळी करुन द्या असे म्हणेल. खासदारांचे काम हे जागा मोकळ्या करुन द्यायचे आहे का असा प्रश्‍न ही शिवेंद्रसिंहराजेंनी केला आहे. 

ते म्हणाले, माझ्यावरच्या अन्यायावर ते शांत बसणार नाहीत असे खासदार म्हणत आहेत. त्याची काळजी उदयनराजेंनी करु नये. अन्याय होईपर्यंत मी तोंडाकडे बघत बसत नाही हे आता त्यांना पण कळाले आहे. अन्याय होत असताना शांत बसणे हा सर्वांत मोठा मुर्खपणा आहे. अन्यायाला वेळच्या वेळी उत्तर देण्याची भुमिका ही नक्कीच मी घेतली आहे हे उदयनराजेंना पण कळून चुकले आहे. त्यामुळे त्यांनी माझ्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत काळजी करु नये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com