उदयनराजेंच्या गाठीभेटीने निष्ठावंत घायाळ 

उमेश बांबरे
सोमवार, 5 डिसेंबर 2016

सातारा-  नगरपालिकेच्या निवडणुकीत डावललेल्या निष्ठावंतांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांची थेट घरी जाऊन भेट घेण्यास सातारा विकास आघाडीचे नेते खासदार उदयनराजे भोसले यांनी सुरवात केली आहे. याच बरोबर आघाडीच्या विरोधात काम करणाऱ्यांच्या घरीही ते जात असल्याने संबंधितांचे धाबे दणाणले आहे. 

सातारा विकास आघाडीने सातारा पालिकेत 22 उमेदवार जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळविले. पण या निवडणुकीत या आघाडीच्या महत्वाच्या मोहऱ्यांना मात्र पराभव पत्करावा लागला. यामध्ये पक्षप्रतोद अॅड. दत्तात्रेय बनकर, माजी नगराध्यक्ष विजय बडेकर, राजू गोडसे, आदींचा समावेश आहे. निवडणुकीतील यशानंतर खासदारांनी ज्या ज्या ठिकाणी उमेदवार चुकले त्या ठिकाणी जाऊन गाठीभेटीवर भर दिला. पराभूत उमेदवारांना धीर देण्याबरोबरच त्यांच्याविरोधात काम करणाऱ्या त्यांच्याच निष्ठावंतांच्या घरीही ते गेले. खुद्द खासदारच घरी येत असल्याने अनेकांचे धाबे दणाणले. पण उदयनराजेंनी तेथेही संयमच दाखविला. त्यांनी सर्वांना धीर देत विरोधात काम केलेल्यांना शुभेच्छाही दिल्या. 

पण महाराजांच्या या संयमानेही निष्ठावंतांनाही घाम फुटला आहे. पण जाता जाता त्यांनी प्रत्येकाला तुम्ही आपलेच आहात यापुढे आमच्यासोबतच रहा असाही सल्ला दिला. यातून त्यांनी सातारा विकास आघाडीचा खुट्टा अधिकच बळकट करण्यावर ही भर दिला आहे. याबरोबरच नगरविकास आघाडीच्या काही नवख्या विजयी उमेदवारांचीही त्यांनी भेट घेतली आहे. त्यांनाही नगरपालिकेत चांगल्या पध्दतीने काम करण्याचा सल्ला दिला दिला आहे. एकुणच उदयनराजेंच्या या भुमिकेमुळे विरोधी आघाडीबरोबरच निष्ठावंतांत समाधानाचे वातावरण पसरले आहे.

Web Title: Udayanraje gives surprise visit upset candidates