उदयनराजे दोन लाख मतांनी पराभूत होतील : पृथ्वीराज चव्हाण

Udayanraje will loose elections by 2 lakhs says Prithviraj Chavan
Udayanraje will loose elections by 2 lakhs says Prithviraj Chavan
Updated on

कऱ्हाड : भाजपकडून सातारा पोटनिवडणूक लढविणारे माजी खासदार उदयनराजे भोसले पोटनिवडणुकीत किमान दोन लाख मतांनी पराभूत होतील, असा असा दावा माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. पक्षश्रेष्ठींचा निर्णय म्हणून लोकसभा लढलो नाही असेही आमदार चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याच वेळी लोकसभेचा उमेदवार असतो आणि आता श्रीनिवास पाटील आहेत तरीही आमचा दोन लाख मतांनी विजय नक्की आहे असा विश्वास आमदार चव्हाण यांनी व्यक्त केला.

अमित शहा यांनी केलेल्या आरोपाबाबत आमदार चव्हाण म्हणाले, खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी कऱ्हाडला येणार होते मात्र निवडणुकीचा अंदाज घेऊन त्यांनी दुय्यम फलंदाज असलेल्या अमित शहा यांना इकडे पाठवला. महाराष्ट्रात येऊन इथल्या प्रश्नावर, इथला रोजगारीवर बोलण्याचे टाळून अमित शहा यांनी 370 कलमावर केलेली वक्तव्य गंभीर आहेत.

अमित शहांनी काश्मिरबाबत अभ्यास करावा त्यांना खरी स्थिती समजले. पंडित नेहरू होते म्हणून आज काश्मीर भारतात आहे. ब्रिटीशांनी ज्यावेळी संस्थाने खालसा केली. त्यावेळी त्यावेळी त्यांनी प्रत्येकाला विचारले होते. आपम स्वतंत्र राज्य ठेवणार, भारतात जाणार की पाकिस्ताना जाणार. त्यानुसार वाटपही झाले होते. त्यावेळी काश्मीर स्वतंत्र राहिले. त्यानंतर युद्द आमि ती स्थिती लक्षात घेवून तेथे 370 कलम लावले. त्यावेळी तत्कालीन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष श्यामप्रसाद मुखर्जीही पंडीत जवाहलाल नेहरू यांच्या सोबत होते. त्यामुळे महाराष्ट्रात येऊन 370 कलमावर बोलणाऱ्या अमित शहांनी काश्मिरबाबत अभ्यास करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

MD Drugs Replace Gang Rivalries: Organized Crime Network Tightens Grip in Western Maharashtra
Anjali Vetal from Karad wins bronze medal at U-15 Asian Wrestling Championship in Thailand
Wildlife rescuer trapped by rat snake
Why are Sangli farmers opposing the Shaktipeeth Highway?
Marathi News Esakal
www.esakal.com