कोल्हापूरः उध्दव ठाकरे अंबाबाई चरणी नतमस्तक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जून 2019

कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज कोल्हापुरात पक्षाच्या विजयी 18 खासदारांसह सहकुटुंब अंबाबाईचे दर्शन घेऊन देवीसमोर नतमस्तक झाले. मंदीरात आल्यानंतर श्री. ठाकरे यांचे स्वागत पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज कोल्हापुरात पक्षाच्या विजयी 18 खासदारांसह सहकुटुंब अंबाबाईचे दर्शन घेऊन देवीसमोर नतमस्तक झाले. मंदीरात आल्यानंतर श्री. ठाकरे यांचे स्वागत पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. देवस्थान समितीच्यावतीने पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी त्यांचे स्वागत केले. 

शिवेसना-भाजप युतीचा राज्यातील प्रचार प्रारंभ कोल्हापुरात झाला होता. त्यावेळी श्री. ठाकरे यांनी कोल्हापुरच्या दोन्हीही जागांवर शिवसेनेचे उमेदवार होऊ देत असे साकडे अंबाबाईला घातले होते. हे नवस फेडण्यासाठी श्री. ठाकरे आज कोल्हापुरात आले होते. त्यांच्यासाबेत पत्नी रश्‍मी, मुलगा आदित्य व नवनिर्वाचित 12 खासदार उपस्थित होते. 

दुपारी एकच्या सुमारास त्यांचे मंदीरात आगमन झाले. तत्पुर्वी अगोदरच केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांच्यासह 12 खासदार गरूड मंडपात येऊन बसले होते. श्री. ठाकरे हेही थेट गरूड मंडपात आले. थोड्यावेळाने पालकमंत्री पाटील हेही याठिकाणी आले. श्री. पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर 18 खासदार व कुटुंबासह श्री. ठाकरे यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. देवीच्या गाभाऱ्याच्या उंबरठ्यावर कपाळ टेकून श्री. ठाकरे देवीसमोर नतमस्तक झाले. सुमारे अर्धातास श्री. ठाकरे मंदीरात होते. 

यावेळी त्यांच्यासोबत नूतन खासदार गजानन किर्तीकर (मुंबई), श्रीरंग बारणे-मावळ, ओमराजे निंबाळकर-उस्मानाबाद, राहूल शेवाळे, राजन विचारे-ठाणे, सदाशिव लोखंडे-शिर्डी, विनायक राऊत-रत्नागिरी, कृपाल ताम्हाणे-रामटेक, प्रतापराव जाधव-बुलढाणा, प्रा. संजय मंडलिक, धैर्यशील माने-कोल्हापूर, माजी खासदार श्रीमती निवेदीता माने, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, आमदार राजेश क्षीरसागर, उल्हास पाटील, प्रकाश आबिटकर, सत्यजित पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, चंद्रदीप नरके, शिवसनेचे मिलिंद नार्वेकर, देवस्थान समिती सदस्य शिवाजी जाधव, संगीता खाडे, नगरसेवक नियाज खान, प्रज्ञा उत्तुरे, राहूल चव्हाण, शहराध्यक्ष रविकिरण इंगवले, सुजित चव्हाण, प्रकाश सरनाईक, सौ. वैशाली क्षीरसागर, देवस्थान चे सचिव विजय पोवार आदि उपस्थित होते. 

प्रचंड गर्दी 
सध्या सुट्ट्या सुरू असल्याने मंदीरात भाविकांची गर्दी होती, त्यात श्री. ठाकरे यांना भेटण्यासाठी कोल्हापूरसह आजूबाजुच्या जिल्ह्यातील शिवसैनिकही मोठ्या संख्येने मंदीरात आल्याने मंदीर परिसरात प्रचंड गर्दी झाली होती. उध्दव ठाकरे यांचे मंदीरात आगमन होताच शिवसैनिकांनी घोषणाबाजी करून हा परिसर दणाणून सोडला.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uddhav Thackeray visit to Ambabai Temple